खाऊन झाल्यावर कचरा म्हणून फेकून देण्यात येणारया देशी विदेशी चॉकलेट रॅपरचा अनोखा संग्रह तुमसर जि भंडारा येथील सई जगदीश फाले या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केला असुन तिचा संग्रह बालपणाच्या आठवणी ताज्या करणारा ठरला आहे.
तिच्या संग्रही सुमारे तीनशेहून अधिक चॉकलेट रॅपर आहेत. आई वडीलासोबत प्रवासाला गावोगावी फीरताना त्या गावात व प्रदेशात मिळणारे चॉकलेट ती खाण्यासाठी म्हणून विकत घेते आणी त्याचे वेस्टेज रॅपर नचुकता खिशात बॅगेत ठेवून गोळा करते. तिच्या संग्रहाची प्रेरणा तिची मामे बहीण अष्लेशा शहारे असुन तिच्या कडे हजारावर नाना चित्र असलेल्या आगपेट्या आहेत. तिला तिच्या मैत्रीणी तिचा संग्रह वाढीसाठी मदत करतात .त्यामध्ये मयुरी तिजारे, रिया रोडगे. दिदाक्षी चौधरी.सानिया गजभीये चे नाव आवर्जून घेते.
अमेरिकन, ऑस्ट्रेलीयन, कॅनडा, दुबई, कुवेत अशा देशासह देशी नामवंत बॅन्ड च्या किंमती चाकलेटची रॅपर तिच्या संग्रही आहेत. तिच्या संग्रहाचे प्रदर्शन ही अनेकांनी लागले असुन तिचे मोठे कौतुक होत आहे. आई व वडील शिक्षक असुन तिच्या संग्रह वाढीसाठी तिला तिचे आजी आजोबा व नातेवाईक सातत्याने मदत करत असतात.
बालक दिनानिमीत्याने तिच्या संग्रहाचे प्रदर्शन भारतीय सस्कार परीषद , आभोरा फाऊंडेशन ने राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन च्या माध्यमातून भरवून तिला प्रोत्साहन देण्यात आले.
— शरद शहारे
वेलतूर
वेलतूर
Leave a Reply