डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चीकीत्सक Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले. त्यांच्या सुरवातीच्या सेवेच्या काळांत ते औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते अतिशय उत्तम शिक्षक होते. प्रत्येक विषयाची उकल अगदी सहजतेने व विद्यार्थ्याला व्यवस्थित लक्षांत यईल ह्या पद्धतीने त्यांची शिकवण्याची हातोटी होती. विषयाला कंटाळवाणे न होऊ देता अधून मधून मार्मिक विनोद करणे ही त्यांची पद्धती होती. एके दिवशी ओ. पी. डी. (Out Patient Department ) मध्ये ते पेशंटला तपासत होते. विद्यर्थ्यांचा एक गट त्यांचे मार्गदर्शन ऐकत होता. प्रत्येक रुग्णाला तपासून त्याला वैद्यकीय सल्ला देत असताना, विद्यार्थ्यांना त्याच्या रोगा विषयी टिपणी करून समजून सांगत होते. एक मुसलमान महिला आपल्या मुलाला घेऊन आली होती. तपासणी झाली, रोग निदान झाले. तिला मार्ग दर्शन करून औषधी लिहून दिली गेली. विद्यार्थ्याकडे वळून ते त्या रोगावर चर्चा करु लागले. ती तिच्या मुलाला घेऊन जाऊ लागली.
परंतु लगेच थांबून तिने विचारले ” लडकेको खानेको तेल घी दे सकते क्या ?”
डॉक्टर लेले “ हां दे सकते ”. डॉक्टर लेले पुन्हा विद्यार्थ्याकडे वळून शिकऊ लागले. परंतु तीच बाई परत आली व विचारू लागली. ” डॉक्टर साहेब क्या लडकेको अंडा, मटण, ये दे सकते क्या?” ते तिच्याकडे मानेने वळून म्हणाले ” चलेगा दे सकते. “ आणि पुढे शिकवणे चालू ठेवले. आश्चर्य म्हणजे तिच्या शंका अद्यापि संपल्या नव्हत्या. पुन्हा ती परतून आत आली. तिला बघताच डॉक्टर लेले एकदम म्हणाले
” देखो बहनजी आप हर चीज खाओ मगर मेरा भेजा मत खाओ.
एकदम सर्व विद्यार्थ्यामध्ये हास्याचा स्फोट झाला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply