नवीन लेखन...

निसर्गरम्य अंबोळगड

निळाशार, अथांग, स्वच्छ आणि वर्दळी पासून मुक्त, नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं रत्नागिरीतलं पर्यटन ठिकाण म्हणजे अंबोळगड. दोन-तीन दिवस लागून सुट्टी असल्यास आणि फक्कड ठिकाणाच्या शोधात असाक तर अंबोळगड व त्याचा आसपासच्या परिसरात किमान एकदा तरी भेट द्यायलाच हवी, कारण निसर्गाने संपन्न अशा ठिकाणाला खाद्य संस्कृतीची सुद्धा अनोखी परंपरा लाभली आहे. विशेषत: मासाहरींसाठी कधीही न खाल्लेल्या माशांची चव इथे तुम्हाला हमखासपणे चाखता येईल.

जर तुम्ही खासगी किंवा स्वत:च्या वाहनाने अंबोळगडला जाणार असाल तर मुंबई-गोवा महामार्गने हातखंब्याला उतरावं. मुंबई पासून अंबोळगडपर्यंतचं अंतर जवळपास ३४६ कि.मी. इतकं असून, हातखंबा फाट्यावरुन रत्नागिरीकडे वळावं हे अंतर ६० कि.मी.चं आहे. तसंच जर का रेल्वे ने जायचे असल्यास कोंकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर उतरुन एस.टी. किंवा खासगी वाहनाने अंबोळगडला जाता येतं.

अंबोळगडचं मुख्य आकर्षण आहे तो म्हणजे गोडिवणे बिच येथून १ कि.मी. अंतरावर गगनगिरी महाराजांचा मठ देखील पाहण्यासारखा आहे. अंबोळगड पासून ३७ कि.मी. अंतरावर राजापूरची गंगा जिचा उगम कधीपण होतो तसेच अचानक थांबतो देखील. अशा सायफन तत्वावरील उत्तम स्थळ मोठ्या आकाराची काशीकुंड, हिराकुंड, वेदिकाकुंड, वरुणकुंड इत्यादी सारखी १४ कुंडे या परिसरात आहेत. येथे एका वटवृक्षाच्या पायथ्याशी मूळ गंगा कुंड आहे, जिथून गंगा नदी उगम पावते.

१२०० वर्षांचा इतिहास लाभलेलं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं धूतपापेश्वर मंदीर व त्यापलिकडचं दत्त मंदीर हि अंबोळगड परिसराची ऐतिहासिक, नैसर्गिक पार्श्वभूमी दर्शवते.

भेट देता येणार्‍या ठिकणांपैकी कनाकादित्य मंदिर तसंच श्री नागेश्वर मंदिरात शेकडो वर्षांपासूनच नगाचं वारुळ व लाकडी पटावर कोरलेली जुनी चित्रं आपल्याला पाहता येतील. ही ठिकाणं अंबोळगडा पासून अनुक्रमे २७ व १९ किलोमीटर अंतरावर असून श्रद्धाळू भाविकांसाठी ही मंदीरे खास पर्वणीच आहेत.

अंबोळगड परिसरात रिसॉर्ट आहेत व टेण्ट मध्येही राहण्याची व्यवस्था होऊ शकते, तसंच राजापूर व रत्नागिरी परिसरात ही अनेक आरामदायी हॉटेल्स आहेत.

एखादं निर्जन ठिकाण किंवा शहरापासून थोडं लांब आणि “सागरी स्वाद” ची किमया अनुभवायची असेल तर कोकणातील पर्यटनासाठी अंबोळगडाला प्राधान्य द्यायला काहीच हरकत नाही.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..