नवीन लेखन...

अमेरिकेतील शाळा

अमेरिकेत शहराशहरात सरकारी आणि स्वतंत्ररित्या चालवलेल्या शाळा असतात. स्वतंत्रपणे चालवलेल्या शाळांमध्ये फी अधिक असते. तुलनेने सरकारी शाळांमध्ये कमी. श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये घालतात. सर्वसाधारण लोक सरकारी शाळा पसंत करतात. या शाळांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार १ ते १० मध्ये गुणांक दिलेले असतात. ते अत्यंत वस्तुनिष्ठतेने आणि कठोर कसोट्यांवर देण्यात येतात. स्वाभाविकपणे ८-९-१० गुण मिळालेल्या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी पालक प्रयत्नशील असतात. म्हणजे मुलांची सर्वांगीण प्रगती होण्याची खात्री त्यांना वाटते. केवळ अभ्यासातील प्रगती हा एकमेव निकष इथे नसतो. ती शाळा ज्या विभागात असते त्याच्या आसपास राहणाऱ्या मुलांना प्राधान्याने प्रवेश मिळतो.

म्हणून पालक स्वत:चे घर घेताना किंवा भाड्याने अपार्टमेंट घेताना शाळेच्या मानांकनाचा विचार करूनच घेतात. या शाळा प्राथमिक (elementary), माध्यमिक (middle school) आणि उच्च (high school) अशा विभागलेल्या असतात. त्या स्वतंत्र मोठ्या मोकळ्या जागांवर बांधलेल्या असतात. त्यांच्या सभोवती भरपूर मैदान असते. तिथे बास्केटबॉल, घसरगुंडी वगैरे खेळण्याची सोय असते. मुलांना अथवा पालकांना बसण्यासाठी लोखंडी बाके बसवलेली असतात. शाळांशेजारी विश्रांतीस्थानांची सोय असते. शाळांमध्ये कॅफेटेरियाही असतो. ज्यांना तिथे पदार्थ विकत घ्यायचे असतात, त्यांची सोय होते. शाळेची वेळ संपल्यानंतर नोकरी करणारे पालक आपल्या मुलांना शाळेशेजारी असलेल्या विश्रांतीस्थानात ठेवतात. ते ऑफिसातून परतताना आपल्या मुलांना तिथून नेऊ शकतात. दरम्यानच्या काळात मुलांच्या खाण्यापिण्याची सोय तिथे करण्यात आलेली असते. अर्थात त्यासाठी पालकांना अधिक पैसे मोजावे लागतात.

शाळा सकाळी साडे आठ वाजता सुरू होते. तेव्हाचे दृष्य पाहण्याजोगे असते. एरव्ही फारशी वर्दळ नसलेले रस्ते गजबजू लागतात. पालक मुलांना घेऊन चालत येतात. दूर राहाणारे एक तर स्कूलबसने मुलांना पाठवतात किंवा स्वत: कारने सोडायला येतात. त्यातही या गाड्यांच्या रहदारीने ट्रॅफिक अडू नये यासाठी काही पालकच व्हॉलिंटिअर म्हणून उभे राहातात. एखादी कार आली की ड्रायव्हिंग करणारा पालक दरवाजा उघडतो आणि बाहेर व्हॉलिंटिअर म्हणून उभा असलेला अन्य विद्यार्थ्याचा पालक त्या कारमधल्या मुलाला उतरवून घेतो. मग मूल शाळेत प्रवेश करते आणि त्याचा पालक आपली कार सुरू करून निघून जातो.

अनेकदा झेब्रा क्रॉसिंगपाशी शिक्षिका किंवा स्वतः मुख्याध्यापक उभे असतात. शाळेच्या पटांगणावर वेगवेगळ्या वर्गांची मुले रांगेत उभी राहातात. आठ वाजून चाळीस मिनिटांनी शिक्षक तिथे येतात आणि आपापल्या वर्गाच्या मुलांना घेऊन वर्गात जातात. त्या नंतर शाळेचे दरवाजे बंद केले जातात. एखादा विद्यार्थी उशिरा आला तर त्याला मेन दरवाज्याने ऑफिसात जावे लागते आणि तिथे आपले, आपल्या पालकांचे नाव, पत्ता, फोननंबर लिहावा लागतो. अशा रीतीने मुलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते..

दर महिन्याला हुशार विद्यार्थ्याला “Best Student Of The Month” असे प्रशस्तीपत्र आणि पालकांना “Parents Of The Best Student Of The Month” असे स्टीकर देण्यात येते. पालकांनी ते आपल्या गाडीच्या मागच्या काचेवर चिकटवायचे.

अमेरिकेतील शाळा मग गजबजून जातात.

— डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..