आपल्याला गरज असते तेव्हा रक्त मिळतेच असे नाही. आणि ऐनवेळी दातेही शोधून सापडत नाहीत. बर्याचदा सार्वजनिक गणपती मंडळे किंवा गल्लीतील छोटा ग्रुप आपल्या परिसरातील दात्यांची यादी बनवून लोकांना उपलब्ध करतात.
मात्र आता रक्तदात्यांची सूचीही ग्लोबल होत आहे. रक्तदात्यांची माहिती देणार्या अनेक वेबसाईटस सुरु होत आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत.
यातीलच एक साईट म्हणजे www.bharatbloodbank.com ही आहे. या वेबसाईटवर भारतातल्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही शहरातील, भागातील कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींची माहिती एका क्लिकवरुन मिळण्याची सोय आहे.
रक्तदातेही आपली सर्व माहिती या वेबसाईटवर देऊ शकतात.
— पूजा निनाद प्रधान
Leave a Reply