जन्म: ५ सप्टेंबर १८८८
मृत्यू: १६ एप्रिल १९७५
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी पाच वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जन्मदिनी शिक्षकदिन साजरा करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते.
अवघ्या जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् हे भारताचे दुसरे राष्ट्रपती. १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी राष्ट्रपतिपदाचा कार्यभार सांभाळला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविण्यात आले. त्यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या ‘इंडियन फिलॉसॉफी’ या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला. त्यांचे उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज, म्हैसूर विद्यापीठ, ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कोलकाता विद्यापीठ आदि ठिकाणी त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक, वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. ते काही काळ राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. भारताचे रशियातील राजदूत म्हणूनही त्यांनी भारताचे रशियातील राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे तसेच अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषिवले. १९५२ १९६२ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला.
Leave a Reply