नवीन लेखन...

‘बूस्ट’ चे सिक्रेट

समोरच्या व्यक्तीला भारावून टाकण्यासाठी सुंदर देखणं वगैरे दिसलं पाहिजे असं काही नसतं ‘नेल्सन मंडेलां’ना अनुभवणार्‍या व्यक्ती आणि त्यांचं साहित्य अनुभवणार्‍या व्यक्ती देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर जाम खूश होतात. एपीजे अब्दुल कलाम, किरण बेदी अगदी आपल्या अण्णा हजारे पर्यंत अनेक व्यक्तिमत्व अशी आहेत की पाहणारा, अनुभवणारा भारावून जातो. असा भारावून जाणं का होतं? हा असा अनुभव आपल्यापैकी सर्वांनीच घेतलेला असतो. काय कारण असावं? असा शोध घेण्याचा प्रयत्न GSK (Glaxo Smith Kline Consumer Healthcare Ltd.) या कंपनीने केला.

ज्याची उमेद संपली तो विशीतला तरुण असला तरी ‘म्हातारा’ अन् त्याच्याकडे उमेद आहे, उत्साह आहे, तो वयोवृद्ध असला तरी तरुणच. हे GSK ने शोधलं आणि उत्साहाने भारलेले म्हणजे Boost! म्हणून तर Boost is the secret of my energy असं म्हणत क्रिकेटवीर कपिल देवनं सारं क्रेडिट बूस्टला देऊन टाकलं. पुढे सतरा वर्षीय सचिन तेंडुलकरने पण कपिल बरोबर ‘लहान तोंडी मोठा घास घेतला’ आणि मोठा झाला. सचिन ने सर्वप्रथम केलेली जाहिरात

केरळमध्ये 1974 मध्ये एनर्जीचं इंधन (Energy Fuel) म्हणून GSK या कंपनीने boost ला मार्केटमध्ये आणली. माल्टयुक्त चॉकलेटची चव असणाऱ्या या उत्पादनाने, आबालवृद्धांना ताजेतवाने, टवटवीत, उत्साही राहण्याची जणू संजीवनीच दिली. या हेल्थ फूड ड्रिंक (HFD) मध्ये कंपनीच्या R&D (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) विभागाने संशोधनानंतर तब्येतीला पोषक पदार्थांचे प्रमाण पत्र मिश्रण तयार केले. ज्यामुळे लाभार्थ्याला boost मिळते/तो.  (उत्साह मिळतो)

यामध्ये कॉपर आणि बायोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे आवश्यक प्रमाणांसह बी-१, बी-२, बी-६, बी -11, ए, सी, डी, फॉलिक ऍसिड आणि 25 टक्के कॅल्शिअम यांचा अंतर्भाव असल्याने बूस्ट ने ते सेवन करणाऱ्यांची एनर्जीच वाढवली आहे.

ब्राऊन, हेल्थ केअर पावडरच्या उत्पादनांमध्ये बुस्ट हे हिंदुस्थानातील सर्वात जास्त खरेदी केले जाणारे उत्पादन आहे. 2003 च्या निरंजनच्या अहवालानुसार 50 हजार टन एवढे उत्पादन बुस्टचे होत होते. आता हे प्रमाण वाढले आहे.

या पदार्थांच्या सेवनाने, शरीराला विटामिन्स आणि मिनरल्स आवश्यक पुरवठा होतोच, परंतु आणखी वाढ एनर्जी आणि रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होते. त्यामुळे उत्साह वाढतो, कामाची गती वाढते आणि समाधानी राहण्यास मदत होते. आज हेच सिक्रेट ओपन सिक्रेट झाले…. या लेखामुळे.

— प्रा. गजानन शेपाळ.

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..