एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता.
कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.
राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला “महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो.”
राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.
थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.
त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला ” पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय.”
प्रवाशी हसून म्हणाला ” महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज.”
भारतात राहून पाकीस्तानची बाजु घेनाऱ्या सर्व कुत्र्यांना समर्पित.
— सुरेश अयाचित
Leave a Reply