जुलै अमेरिकन अभिनेत्री व गायिका सेलेना गोमेज चा जन्म २२ जुलै १९९२ रोजी झाला.
गुड फॉर यू, सेम ओल्ड लव, बॅक टू यू अशा सेलेना गोमेजच्या शानदार गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांना वेड लावले आहे. सेलेना गोमेज ने ‘होटल ट्रांसिल्वानिया 3-समर व्हॅकेशन’या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. या अॅनिमेटेड चित्रपटाला सेलेना आपला आवाज देणार आहे. गायिका असण्यासोबत सेलेना एक अभिनेत्री आणि निर्मातीही आहे. २००७ मध्ये डिज्नी टीव्ही सीरिज विजार्ड ऑफ वेवर्ली प्लेसने तिला प्रचंड लोकप्रीय मिळवूल दिली. यात तिने एलेक्स रूसोची भूमिका साकारली होती.
सेलेना गोमेज ए. आर. रेहमानची खूप मोठी चाहती आहे.एका मुलाखतीत खुद्द सेलेनाने ही कबुली दिली.मी भारतीय संगीत मनापासून ऐकेते आणि ते मला आवडतेही. ए़ आऱ रेहमानचे संगीत मला सर्वाधिक आवडते़ त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला प्रचंड आनंद होईल, बॉलिवूडसाठी गायलाही मला आवडेल,असे सेलेना म्हणाली. भारतीय संस्कृतीबद्दलही सेलेना बोलली. मला भारत आणि भारतातील हिंदू संस्कृती पूर्वापार आवडते. माझे अनेक सहकारी आणि मॅनेजर संपूर्ण जगभर फिरतात. मी सुद्धा त्यांच्यासोबत फिरते. पण भारतीय संस्कृतीबद्दल माझ्या मनात विशेष आस्था आहे, असे ती म्हणाली.
सेलिना ही तिच्या अभिनय, गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. पण त्याचसोबत ती आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आली होती. तिचे पॉप स्टार जस्टिन बीबरसोबत अफेअर होते. या अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती.
अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी २४ करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने त्यांच्या एका बातमीत म्हटले होते. सेलिनाचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोव्हर्स आहेत. ती गायनासोबतच विजार्ड ऑफ वेवर्ली या मालिकेतील एलेक्स रुसोच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तसेच ती अँड द सीन नावाच्या पॉप बँडची मुख्य गायिका आहे. सेलिना खूपच लहान वयात एका आजाराला सामोरी गेली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये सेलिनाची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. तिची मैत्रीण फ्रान्सिया रेसियाने तिला किडनी दिली होती. या आजारपणामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने गायन, अभिनय सगळे काही सोडून दिले होते. ती या सगळ्यातून बाहेर पडेल असे तिला वाटलेच नव्हते. तिने मुलाखतीत देखील सांगितले होते की, मी या आजारपणातून कधी बाहेर पडेन असे मला वाटले नव्हते. पण माझ्या लाडक्या मैत्रिणीने मला किडनी दिली आणि तिच्यामुळेच मी या आजारपणातून बाहेर पडले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply