नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते डॉ.याकूब सईद

मुंबई दूरदर्शनचे माजी संचालक व ‘नटरंग’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस,’ अशा विविध चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ.याकूब सईद यांचा जन्म १४ जुलै १९३४ रोजी झाला.

मुंबई दूरदर्शनचे माजी संचालक, आकाशवाणीच्या विविध विभागांचे माजी प्रमुख असलेले सईद कसलेले अभिनेते म्हणूनही परिचित आहेत. याकूब सईद म्हणजे एक चालता बोलता फिल्म इन्स्टिटय़ूट आहे. ‘होशियार’ आणि ‘हास परिहास’ह्या कार्यक्रमाच्या वेळी नवे नवे प्रयोग करणे हा त्यांचा छंद होता.

याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. डब्ल्यू. झेड.अहमद हे त्याचे मालक होते. त्यांची पत्नी नीना या अभिनेत्री होत्या,त्या मुळे मोतीलाल, श्यामा, पृथ्वीराज कपूर हे सगळे थोर कलाकार, कृष्णा चन्दर, अली सरदार जाफरी, जोश मलिहाबादी, अख्तुरल इमाम, असे त्यांना तेथे लेखक-कवी येत असत. शाळा शिकून काम करतो म्हणून याकुब हे त्यांचा आवडता गडी होता. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले.

पुढे याकूब सईद १३ डिसेंबर १९५८ रोजी कार्यक्रम अधिकारी म्हणून पुणे आकाशवाणीत रुजू झाले. नंतर पुणे, सांगली, दिल्ली असं करून पुढे डायरेक्टर म्हणून नागपूरला बदली झाली. त्या काळी फार कमी ऑफिसरांची जेव्हा दूरदर्शन चालू झाले बदली झाली त्यातील एक याकूब सईद होते. ते दिल्लीतील प्रशिक्षणा नंतर मुंबई दूरदर्शन वर जॉईन झाले. ते १९९२ मध्ये ‘दूरदर्शन कलकत्ता’ येथून डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले.

मुंबई दूरदर्शन वर काम करत असताना चित्रपटातल्या लोकांच्या ओळखीचा फायदा झाला. याकूब सईद यांच्याकडे मराठी, हिंदी चित्रपट विभाग आला. तेथे खूप मनापासून चांगलं काम केलं. त्यांनी बबन प्रभू यांच्या बरोबर ‘हास परिहास’ या विनोदी मालिकेची निर्मिती केली. ती मालिका १९७३ ते १९७६ पर्यंत चालू होती.’हास परिहास’ या विनोदी मालिका खूपच गाजली होती.

निवृत्तीनंतर त्यांनी वेगळी इनिंग सुरू झाली.त्यांनी विविध चित्रपटांतून छोट्या, पण महत्त्वाच्या आणि आशयपूर्ण भूमिका त्यांनी केल्या.‘लगे रहो मुन्नाभाई’पासून चित्रपटात अभिनय करायला सुरुवात झाली. आजवर हिंदी-मराठी मिळून ३५ ते ४० चित्रपटांत काम केलं. ‘नटरंग’, ‘जॉली एल एल बी -२’ मधल्या भूमिका लोकांना आवडल्या.

प्रा.विलास जोशी या त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून याकुब यांनी पुणे विद्यापीठात ‘कॉन्ट्रिब्युशन ऑफ उर्दू लँग्वेज इन इंडियन सिनेमा’या विषयावर संशोधन करायचं ठरवलं, नोंदणी केली आणि ५ ते ७ वर्षे कसून अभ्यास केला. २०१७ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी संशोधन पूर्ण करत त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तो प्रबंध सादर केला. याकुब यांनी पी.एच.डी. मिळवली.त्यांचे ‘मुंगीची सावली’ हे आत्मचरित्रात्मक आठवणींचे पुस्तक; तसेच ‘हास परिहास’हे पुस्तक प्रसिद्ध आहे. याकुब यांना एक मुलगी असून त्या डॉक्टर आहेत.

याकूब सईद यांचे हिंदी चित्रपट:’मुन्नाभाई एमबीबीएस,”जॉली एलएलबी २,’ ,हॅटट्रिक’,’कॉर्पोरेट’.

याकूब सईद यांचे मराठी चित्रपट:‘नटरंग’,’अडगूळ मडगूळ’,’राक्षस’,’सेट्रीका’,’येरे येरे पैसा’,’एकविरा देवी’,भानामती.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..