ज्येष्ठ अभिनेत्री व कळसुत्रीकार मीना नाईक यांचा जन्म १९ जून १९५१ रोजी झाला.
मीना या समाजभान असणारी रंगकर्मी व कळसुत्रीकार म्हणून ओळखल्या जातात. मीना नाईक या माहेरच्या मीना सुखटणकर होत.मीना नाईक यांचे शिक्षण मुंबईत झाले असून, त्यांनी १९७२ मध्ये मुंबईतील जे जे इंस्टिट्यूशन ऑफ एप्लाइड आर्ट येथून जे डी आर्टस् पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले तसेच मुंबई विद्यापीठामधून बी. ए. १९८० व म.ए. १९८३ साली पूर्ण केले.
१९७६ ते १९७८ या काळात त्यांनी पेपेट्री मध्ये अभ्यास केला. त्या वेळी त्यांना पेपेट्रीमध्ये मध्ये जपान फौंडेशन आणि भारत सरकार कडून दोन शिष्यवृत्ती मिळाल्या होत्या.
मीना नाईक यांनी समाजातील अनेक संवेदनशील विषयावर लघुपट व ऍनिमेशन चित्रपट तयार केले आहेत. त्यांनी ‘वाटे वरती काचा ग’ या नाटकाद्वारे बाललैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. काही काळापूर्वी मीना नाईक यांनी बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या ‘कळसूत्री’-निर्मित ‘अभया’ या एकल – महिला हा नाट्यप्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत झाला होता.
२०१० मध्ये त्यांना दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनी कडून हिरकणी ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
याच बरोबर त्यांनी दूरदर्शन वरचे किलबिल, अमृत मंथन अशा अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.
मीना नाईक यांनी यशवंतराव चव्हाण या चित्रपटात अभिनय केला आहे. नुकताच काम केलेला चित्रपट म्हणजे हृदयांतर.अभिनेत्री व निर्मात्या मनवा नाईक या त्यांच्या कन्या होत. ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’ या चित्रपटात मीना नाईक आणि मनवा नाईक या दोघी मायलेकी प्रथमच एकत्र काम करताना दिसल्या होत्या.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply