नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी कृष्णराव चोणकर

ज्येष्ठ अभिनेत्री व ज्येष्ठ गायक विश्वनाथबागुल यांच्या पत्नी नलिनी कृष्णराव चोणकर यांचा जन्म १२ जून १९३८ रोजी झाला.

बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत गायक व नट म्हणून काम करणारे, तसेच ‘सोनी महिवाल’, ‘अफगाण अबला’, ‘सौभाग्यलक्ष्मी’ आदी बोलपटांमधून अभिनेते म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणाऱ्या कृष्णराव चोणकर यांच्या कन्या म्हणजे नलिनी चोणकर.

घरातूनच अभिनयाचा वारसा लाभलेल्या नलिनी यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्या आवडीपोटीच त्यांनी नृत्याचे रीतसर शिक्षणही घेतले होते. रेखीव चेहरा आणि आकर्षक डोळे असणाऱ्या नलिनी चोणकर यांना दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी १९५७ साली ‘घरचं झालं थोडं’ या विनोदी चित्रपटात काम दिले. राजा गोसावी यांच्यासारख्या कसलेल्या नटाबरोबर केलेल्या त्यांच्या अभिनयाला आणखी झळाळी आली आणि पदार्पणातल्या या चित्रपटानेच त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होणाऱ्या नलिनी चोणकर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवेशही दमदार ठरला, तो ‘राणी रूपमती’, ‘साजिश’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे. त्यांनी साकारलेल्या नायिकांच्या भूमिकांमुळे ‘श्रावणकुमार’, ‘सिंहलदीप की सुंदरी’ हे हिंदी चित्रपटही खूप गाजले. १९५९ साली राजा नेने दिग्दर्शित ‘याला जीवन ऐसे नाव’ या विनोदी चित्रपटात नलिनी चोणकर यांनी महत्त्वाची भूमिका केली. मधुसूदन कालेलकर निर्मित या चित्रपटात जयश्री गडकर, राजा गोसावी, शरद तळवलकर या कलाकारांसमवेत नलिनी यांनीही खूप तन्मय होऊन भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयातील वैशिष्ट्य लक्षात आल्यावरच त्यांना हिंदीतील ‘मदन मंजिरी’, ‘मॉडेल गर्ल’, ‘पिया मिलन की आस’ या चित्रपटांतून भूमिका मिळाल्या. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून नावाजल्या गेलेल्या नलिनी चोणकर यांनी वडील कृष्णराव चोणकर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘नंदादीप’ (१९६२) या चित्रपटाची निर्मिती केली. तसेच यात त्यांनी गुजराती अभिनेते विजयदत्त यांच्यासमवेत नायिकेची भूमिकाही साकारली.

चित्रपट निर्मितीत अपयशी ठरूनही नलिनी चोणकर यांनी आपली अभिनयाची कारकिर्द सुरूच ठेवली, म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा….’ हे नलिनी चोणकर यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. देवाच्या नावाने सोडलेल्या स्त्रीची मानसिक कुचंबणा दाखवणाऱ्या १९६४ सालच्या ‘वाघ्यामुरळी’ या मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेले मुरळीचे दैन्य त्यातल्या बारकाव्यांनिशी नलिनी चोणकर यांनी सक्षमपणे आपल्या भूमिकेतून उलगडले होते. गुजराती भाषा ज्ञात असणाऱ्या नलिनी चोणकर यांनी ‘ढोल मारु’, ‘पाकीटमार’, ‘रानी रिक्षावाली’ या गुजराती चित्रपटांतूनही केलेले काम त्यांना पुरस्काराचे मानकरी ठरवून गेले. ‘मत्स्यगंधा’, ‘प्रीतिसंगम’, ‘मीरामधुरा’, ‘बावनखणी’, ‘अठरावं वरीस धोक्याचं’ अशा नाटकांमधून नलिनी चोणकर यांनी साकारलेल्या भूमिकांनी रंगमचांविषयीची त्यांची जाणही व्यक्त झाली, तसेच त्यांच्या कामाचे खूप कौतुकही झाले.

‘मीरामधुरा’ नाटकातील त्यांचे सहकलाकार विश्वतनाथ बागुल यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर त्यांचा चित्रपटसृष्टीशी असणारा संपर्क कमी झाला व जो राहिला तो केवळ हिंदी चित्रपटांशीच. म्हणूनच मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी भूमिका केलेल्या ‘प्यारी बहना’ या चित्रपटानंतर त्या या क्षेत्रातून निवृत्त झाल्या. पण नृत्य व अभिनयाशी असणारे त्यांचे दृढ नाते त्यांना स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी १९८५ साली नृत्य आणि अभिनय याचे शिक्षण देणारी संस्था सुरू केली.

नलिनी कृष्णराव चोणकर यांचे २६ जून २००५ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..