नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे

जन्म. ३१ मे १९४५ कोल्हापूर येथे.

उमा यांचे मूळ व पूर्ण नाव अनुसूया साक्रीकर. उमा हे नाव त्यांना लता मंगेशकर यांनी दिले होते.

सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा यांनी मराठी रसिक मनावर राज्य केले. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात उमा यांचा जन्म झाला. त्यांची आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत, तर वडील श्रीकृष्ण साक्रीकर हे आचार्य अत्रे यांच्या कंपनीत होते. कोल्हापूरला त्या काळात अनेक मेळे होत. या मेळ्यांतून उमा यांना संधी मिळाली. या काळात त्यांनी मिरजकर यांच्याकडे कथक आणि भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. काही नाटकांमधूनही कामे केली.

भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले. आई थोर तुझे उपकार हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावामधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. यातील गाणीही लोकप्रिय झाली.

दोस्ती या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केली. या चित्रपटातील गुडिया हमसे रुठी रहोगी हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणेही रसिकांच्या ओठांवर आजही रेंगाळते. उमा यांचा भालू हा चित्रपटही खूप गाजला.

त्यांनी ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्याशिवाय भोजपुरी आणि तेलुगू चित्रपटांमध्येही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पी. सावळाराम गंगा-जमुना पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा व्ही. शांताराम पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

उमा भेंडे यांचं १९ जुलै २०१७ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..