काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२१ रोजी झाला.
१९४५ पासून ‘केसरी’च्या संपादनाचे काम करत असताना स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून देणारे जयंतराव टिळक हे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार झाले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष होते. ‘मी जयंत टिळक’ हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
जयंतराव टिळक यांचे निधन २३ एप्रिल २००१ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply