नवीन लेखन...

ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी

जयवंत नाडकर्णी हे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे शिष्य होते. जयवंत नाडकर्णी यांनी नानासाहेबांसोबत हॅम्लेट आणि इतर व्यावसायिक नाटकांत भूमिका केल्या. शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या. जयवंत नाडकर्णी यांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाची अनेक सुवर्ण पदके प्राप्त झाली होती. तसेच त्यांना मुंबई महानगर पालिकेतून १९८४ या वर्षी निवृत्त होईपर्यंत खात्यांतर्गत, आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत अभिनयाचे, दिग्दर्शनाचे अनेक सन्मान प्राप्त झाले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या रंगायन या नाट्यसंस्थेच्या प्रत्येक नाट्य कलाकृतीत नाडकर्णी यांचा प्रामुख्याने सहभाग असे. नाडकर्णी यांनी अरुण काकडे, माधव वाटवे, विमल जोशी, लालन सारंग, कमलाकर सारंग, कमलाकर नाडकर्णी, दामु केंकरे, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे, कुमुद चास्कर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, उषा नाडकर्णी, स्नेहलता प्रधान अशा ज्येष्ट कलाकारांसोबत अनेक प्रायोगिक, तसेच व्यावसायिक नाट्यकृती सादर केल्या. जयवंत नाडकर्णी यांचे १३ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..