नवीन लेखन...

ज्येष्ठ सिनेपत्रकार अरुण पुराणिक

ज्येष्ठ सिनेपत्रकार व लेखक व हौशी सिनेप्रेमी अरुण पुराणिक यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९५० रोजी झाला.

अरुण पुराणिक यांच्या कुटुंबाला संगीताची पार्श्वपभूमी आहे. त्यांुचे आजोबा पंढरपूरकर बुवा हे ‘गंधर्व नाटक कंपनी’त मुख्यव गायक म्हाणून कामास होते. त्यां्नी अभिनेत्री शांता आपटे यांना शास्त्री य संगीताचे धडे दिले होते. अरुण पुराणिक हे ‘रिलायन्सी’ कंपनीतून उपाध्यतक्ष पदावरून निवृत्त‍ झाले. त्यांनी ‘टाटा पॉवर’ मध्येण सल्लागार म्हयणूनही काम केले आहेत.

पासष्ट हजार हिंदी क्लासिकल आणि फिल्मी गाण्यांचा संग्रह, दहा हजारहून अधिक सिनेमांची पोस्टर्स, बुकलेट्स, ग्लास लाईट असं पब्लिसिटी मटेरीअल, लीला चिटणीस ते हेमामालिनी अशा हिरॉईन्सचे जवळपास साडेसातशे दुर्मिळ फोटोज्, हे सगळं कलेक्शन अरुण पुराणिक यांच्या कडे आहे. आज अरुण पुराणिक यांच्याकडे जगातल्या जवळपास सगळ्या रेकॉर्ड कंपन्यांच्या रेकॉर्ड आहेत. ओडीयन, जय भरत, झोनोफोन, कोलंबिया…तुम्ही म्हणाल ती कंपनी.

त्याच बरोबरीनं त्यांना सिनेमाची पोस्टर्स जमवण्याचा छंद आहे. सिनेमांची पोस्टर्स, बुकलेटस्, ग्लास लाईटस्, बॅनर्स, पोस्टकार्डस्, शो कार्डस्, कॅलेंडर अशी दहा हजाराच्यावर पब्लिसिटी मटेरिअल त्यांच्या आहे. हे सगळं मटेरिअल केवळ छंदापायी जमवलं असलं तरीही हिंदी सिनेमाचा दस्ताऐवज म्हणून त्याच महत्व मोठं आहे. हा दस्ताऐवज पुण्याच्या फिल्म आर्काइव्हकडेही नाही असे त्यांचे म्हणणे आहे,

अरुण पुराणिक यांच्याकडे एकोणीशे पासष्ट सालापर्यंतचं सिनेमांचं, एकोणीशे दहापासून ते एकोणीशे पन्नासपर्यंतचं भारतीय आणि वेस्टर्न संगीत असा अमुल्य ठेवा आहे. या संग्रहातील काही माहिती पुराणिक यांनी डिजिटलाईज केलीय. सिनेमावरील अनेक पुस्तकांमध्ये पुराणिक यांच्या संग्रहातील फोटो वापरण्यात आलेत. फिल्मस्टार देवानंद यांच्या निधनानंतर मेहबूब स्टुडिओमध्ये श्रद्धांजली सभा आयोजीत करण्यात आली होती त्या सभेत पुराणिक यांच्याकडील देवानंदचे फोटोज् वापरण्यात आले होते. त्यांच्याजवळील फोटोज् वापरुन लता आणि हिरॉईन्स संकल्पनेवर कॅलेंडरही प्रसिद्ध झालय. २००० साली बीबीसी लंडनसाठी पुराणिक यांच्या संग्रहातील गाण्यांच्या रेकॉर्डस् वापरण्यात आल्या होत्या. त्यांच्या या सहकार्याबद्दल बीबीसीनं ऑस्कर पुरस्कार पटकावलेल्या ८४ फिल्मचं स्पेशल कलेक्शन पुराणिक यांना भेट म्हणून पाठवलं. पहिला भारतीय सिनेमाचा मान ज्या मराठी फिल्मला मिळाला तो सिनेमा ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’ पुराणिक त्यांच्या संग्रहात आहे.

अरुण पुराणिक १९८६ सालापासून वर्तमानपत्रे-साप्तातहिके यांमधून सातत्या ने लेखन करत आहेत. ते चित्रपट, संगीत, मुंबईतील जुनी स्थ ळे अशा विविध विषयांचा शोध घेऊन लेखन करतात. त्यां चे दीड हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले असून ‘सरगम’, ‘अनसंग हिरोज’, ‘हमारी याद आयेगी’, ‘मुंबई टॉकिज’ अशी पुस्त्के प्रकाशित झाली आहेत. त्यांयनी ‘सिनेमाची शंभर वर्षे’, ‘सिनेमा आणि मुंबई शहर’ अशा विषयांवरील फोटो, पोस्टीर्स, लॉबी कार्ड, पुस्तीचका यांची प्रदर्शने भरवली आहेत.

एक अभ्यासक म्हणून अरुण पुराणिक यांना आजही मुंबईतल्या सोमय्या कॉलेज, किर्ती कॉलेजमधून बोलावणी येतात. एशियाटीक लायब्ररीमध्ये त्यांची व्याख्यानं होतात. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या संग्रहातील काही गोष्टींचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. तिथे लोकं भेटतात, बोलतात. पण ते पुरेसं नाहीये. या विषयात अधिक संशोधन करणारी माणसं निर्माण झाली पाहिजे. हा सगळा संग्रह लोकांना पहाता यावा, सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळता यावा यासाठी एक स्टडी सेंटर उभारण्याचा पुराणिक यांचा विचार आहे. मात्र हे काम खर्चिक आहे. कलेची जाण असणारी योग्य माणसं मिळाली तर एक दिवस हे स्टडी सेंटर उभं राहील असा विश्वास पुराणिक यांना आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..