ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड यांचा जन्म १५ जूनला झाला.
पत्रकारितेच्या माध्यमातून मंत्रालयात आलेले खंडुराज गायकवाड पंचवीस वर्षात शिखरावर पोहोचले आणि अनेक मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, चित्रपट, नाट्य, लोककला या क्षेत्रातील मान्यवरांच्या गळ्यातले ताईत बनले. खंडुराज हे लोककलेचे अभ्यासू असल्याने आणि अनेकांना त्यांनी मदत केल्यामुळे लोकप्रियता वाढली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांचे आवडते मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांनी खंडुराज गायकवाड यांच्या लोककलेचा अभ्यास पाहून ते केंद्रात मंत्री असतांना भारताच्या पश्चिम विभागीय समितीवर त्यांची नेमणूक केली होती. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, लोककलावंत अनुदान पॅकेज समिती,कै विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार निवड समितीवर खंडुराज गायकवाड यांनी कार्य केले आहे.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संघटनेवर ते अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून सक्रिय राहीले आहेत.
नारायणगाव जि पुणे येथे ज्येष्ठ लोकलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने स्मारक व्हावे तसेच लोककलावंताच्या मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी सरकारने आश्रम शाळा सुरू करण्यासाठी त्यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.
खंडुराज गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply