वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा जन्म २४ मे १९६५ रोजी अहमदाबाद येथे झाला.
राजदीप सरदेसाई हे देशातील नामवंत पत्रकार आहेत. राजदीप सरदेसाई यांचे वडील दिलीप सरदेसाई हे जेष्ठ क्रिकेटपटू होते. त्यांची आई नंदिनी सरदेसाई या सेंट सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईत समाजशास्त्र विभागाच्या मुख्य होत्या. राजदीप सरदेसाई यांनी मुंबईतील कैथेड्रल एंड जॉन कौनौन स्कूल आणि कॅम्पियन स्कूल शिक्षण घेतले, पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्र अर्थ शास्त्रात पदवी घेतली. पुढे त्यांनी ऑक्सफर्डमध्ये वकिलीचे शिक्षण घेतले. तिथून आल्यावर मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. अवघ्या दोन महिन्यांच्या प्रॅक्टीसनंतर त्यांच्या लक्षात आलं की, वकिली आपल्याला जमणार नाही. वकिली जमेना, असं कळल्यावर पत्रकार व्हायचं ठरवलं अन् पत्रकार झाले.
त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स ऑफ इंडियापासून केली आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते मुंबई आवृत्तीचे सिटी संपादक होते. सहा वर्षे टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी केल्यावर राजदीप सरदेसाई यांनी १९९४ मध्ये न्यू दिल्ली टेलिविझन (एनडीटीव्ही) मध्ये संपादक म्हणून नोकरीला सुरुवात करून टेलिव्हीजन पत्रकारिता मध्ये त्यांनी पदार्पण केले. आपली स्वत: ची कंपनी ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूज (जीबीएन) तयार करण्यासाठी त्यांनी एनडीटीव्ही सोडली.
राजदीप सरदेसाई एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिले आहेत. जनसंख्या परिषद आणि भारतीय प्रेस क्लबचे सदस्य देखील राहिले आहेत. इंग्रजी दैनिक बातम्यांची कॉलम देखील लिहितात. राजदीप सरदेसाई यांना खास करून गुजराथच्या दंगलींच्या वेळेस खूप प्रसिद्धी मिळाली. राजदीप सरदेसाई यांनी पत्नी सागरिका घोष या पण जेष्ठ पत्रकार असून, सागरिका घोष यांनी इंदिरा गांधी यांच्यावर लिहिलेल्या ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकावर विद्या बालन चित्रपट बनवत आहे. १९७५ साली इंदिरा गांधीनी आणीबाणी घोषित करण्यामागचे कारण, त्यांचे न टिकलेले लग्न, मुलगा संजय आणि त्यांच्या नात्यात असणारा तणाव आणि त्यांच्या काही राजकीय गोष्टी या पुस्तकातून उलगडण्यात आल्या आहेत.
सागरीका घोष यांचे वडील भास्कर घोष यांची निवड प्रसार भारतीचे ( त्यावेळच्या दूरदर्शनचे ) प्रमुख म्हणून कॉंग्रेसने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात केली होती. ते गांधी घराण्याचे अत्यंत निष्ठावान सेवक गणले गेले होते. सागरीका घोष यांच्या मावशी रूमा पाल या नेहरू घराण्याच्या अगदी जवळच्या होत्या आणि त्या सुप्रिम कोर्टाच्या जज्ज होत्या. दुसऱ्या मावशी अरुंधती घोष या नेहरू घराण्याच्या सरकारच्या काळातील परदेश खात्यातील एक अधिकारी होत्या. नंतर त्यांना काँग्रेसने विविध देशात राजदूत म्हणून नेमले होते. त्यांना विवीध देशात या कामगिरीवर पाठवण्यात आलेले होते.
सध्या राजदीप सरदेसाई हे इंडिया टुडे समवेत सल्लागार संपादक आहेत आणि इंडिया टुडेवरील प्राइम टाइम शोचे अँकर आहेत. त्याचा कार्यक्रम ‘बिग फाइट’ने सलग दोनदा सर्वोत्कृष्ट टॉक शोसाठी आशियाई टीव्ही पुरस्कार जिंकला आहे.
२००० मध्ये जागतिक आर्थिक मंचातर्फे त्यांना ग्लोबल लीडर म्हणून निवडले गेले होते. राजदीप सरदेसाई हिंदुस्तान टाईम्ससह अनेक वर्तमानपत्रांमध्ये एक पंधरवडा स्तंभ लिहितात.
राष्ट्रीय राजकारणात तज्ज्ञ असलेल्या राजदीप सरदेसाई यांना पत्रकारितेसाठी प्रतिष्ठित पद्मश्री, २००२ च्या गुजरात दंगलीच्या व्याप्तीसाठी आंतरराष्ट्रीय प्रसारण पुरस्कार, २००७ चा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्ड यासह पत्रकारिता उत्कृष्टतेचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
राजदीप सरदेसाई यांनी ‘२०१४ : The Election That Changed India’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद निखिल वागळे यांनी केला आहे. राजदीप सरदेसाई यांच्या डेमोक्रसीज इलेव्हन ( भारतीय क्रिकेटची महान गाथा) या पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. आजचे देवेंद्र उद्याचे नरेंद्र? या पुस्तकाचे मूळ लेखक-राजदीप सरदेसाई असून त्याचा भावानुवाद ऋग्वेद कुलकर्णी यांनी केला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply