ज्योत्स्ना देवधर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये विपुल लिखाण केलं. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला. जोत्स्नाताईंनी २१ कथासंग्रह, १९ कादंबर्या, ४ ललितलेख संग्रह, आणि अनेक नाटक लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली ‘घर गंगेच्या काठी’ ही कादंबरी विशेष गाजली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने जेष्ठ साहित्यिक तर अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनात भारत भाषा पुरस्कारानं जोत्स्नाताईंचा गौरव केला होता.
त्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.
ज्योत्स्ना देवधर यांचे १७ जानेवारी २०१३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply