ज्येष्ठ मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री कामिनी कदम यांचा जन्म ३ ऑगस्ट १९३३ रोजी झाला.
माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात कामे केली. कामिनी कदम यांनी स्मिता हे नाव धारण करून ये रे माझ्या मागल्या या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. व्ही. शांताराम यांचे बंधू व छायालेखक व्ही. अवधूत यांच्या त्या मेहुणी. असे म्हणतात अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे नाव तिच्या नावावरुन ठेवले होते. १९५८ साली आपले नाव कामिनी कदम करून हिंदी चित्रपट सृष्टीत तलाक या चित्रपटाद्वारे प्रवेश केला.
कामिनी कदम यांचे चित्रपट. ये रे माझ्या मागल्या, माझा होशील का?, वाट चुकलेले नवरे, गाठ पडली ठका ठका, देवाघरचं लेणं, नवरा म्हणू नये आपला, पहिलं प्रेम, दोन घडीचा डाव, आंधळा मागतो एक डोळा, तलाक, संतान, मिया बिबी राजी, स्कूल मास्टर, माँ बाप, सपने सुहाने, धर्मपत्नी.
कामिनी कदम यांचे १९ जून २००० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply