नवीन लेखन...

ज्येष्ठ मिमिक्री आर्टिस्ट, गायक सुदेश भोसले

ज्येष्ठ मिमिक्री आर्टिस्ट, गायक सुदेश भोसले यांचा जन्म १ जुलै १९६१ रोजी झाला.

आज विविध कॉन्सर्टांमधून, परदेश दौऱ्यातून परफॉर्मन्स देणारे सुदेश भोसले हे ‘दुर्गाबाई शिरोडकरांचे’ नातू आहेत हे कळल्यावर गायन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे आदराने कानाची ‘पाळी’ पकडतात ते पाहून सुदेश गहिवरतात. लतादीदी, आशाताई, पं. हृदयनाथ, गुलाम मुस्तफा खान यांसारख्या दिग्गजांनी आपल्या आजीविषयी काढलेले भावोद्गार ऐकून ते हेलावतात. सुदेश भोसले यांच्या आजी दुर्गाबाई शिरोडकर या त्यांच्या पिढीतल्या नामवंत शास्त्रीय गायिका होत्या. पण त्या असेपर्यंत सुदेश यांना त्यांच्याकडून कधीच गाणे शिकायला मिळालं नाही, कारण तेव्हा त्यांच्या मनात गाणे असे कधी आलेच नव्हते. सुदेश भोसले यांची आई सुमन भोसले यासुद्धा उत्तम गायिका होत्या आणि दुर्गाबाईंच्या तालमीत तयार झालेल्या होत्या. दोघी आकाशवाणीवर ‘ए’ ग्रेड गायिका म्हणून नावाजलेल्या होत्या. आई एवढी उत्तम गायिका असूनही तिने सुदेशना समोर बसवून गाणे शिकवले नाही. वडील चित्रकार नरेंद्र भोसले यांचा चित्रपटांची मोठमोठी होर्डिंग्ज रंगवण्याचा व्यवसाय होता. सुदेश यांना कॉलेजपासूनच पोट्रेट्स काढायचा छंद जडला होता. त्यामुळे ते वडिलांना पोस्टर रंगवण्यात मदत करत. ‘जूली’, ‘प्रेमनगर’,’ स्वर्ग नरक’ इत्यादी चित्रपटांची पोस्टर्स सुदेश भोसले यांनीच रंगवली आहेत.
गाणे घरात आणि स्वतःत असूनही, जेव्हा सुदेश ‘मेलडी मेकर्स’ मध्ये गेले तेव्हा त्यांच्या गायनावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर ते शास्त्रीय संगीतावर भर द्यायला लागले. गाणे आणि पेंटिंग हे जवळ असूनही त्याचे शिक्षण ज्या वयात व्हायला हवे होते तेव्हा झाले नाही. अनुभवाने ते हळूहळू गाणे शिकत गेले. सुदेश भोसले यांचे गाणे हे केवळ त्यांच्या छंदातून, आणि गायकांच्या नकला करणे हे कॉलेजमधल्या टाइमपासमधून सुरू झाले. गायन क्षेत्रात ‘करिअर’ करावयाचे ठरल्यानंतर सुदेश यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुदेश भोसले आणि बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांचे अतूट असे नाते आहे. अमिताभ बच्चन यांची ‘मिमिक्री’करता करता सुदेश भोसले यांचा आवाज अमिताभ बच्चन यांचा आवाज झाला. सुदेश भोसले यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी “चुम्मा चुम्मा‘, “शावा शावा‘, “सोना सोना‘, “मेरी मखना‘ ही गाणी गायली आहेत.

आपल्या गायन श्रेष्ठ आजीचा सहवास आपल्याला फार काळ लाभला नसला हे जरी खरे असले तरी त्याची भरपाई सुदेश एका ‘म्युझिक इन्स्टिटय़ूट’च्या उभारणीने करत आहेत. दुर्गाबाईंनी गायलेल्या अप्रतिम बंदिशी आणि विविध राग यांचे मैफलीतून झालेले सादरीकरण ते रेकॉर्ड, कॅसेटच्या माध्यमातून जतन करून ठेवीत आहेत. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि दुर्गाबाईंची गायनस्मृती जपून ठेवण्याच्या उद्देशाने ते गोव्यातील ‘शिरोडा’ येथे दुर्गाबाईंच्या राहत्या घरी ‘कलाघर’ हा उपक्रम साकारत आहेत. दुर्गाबाईं विषयीच्या उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी व दुर्गाबाईंचे नात-जावई शंकर पटनाईक यांनी फिल्म डिव्हिजनसाठी एक लघुचित्रपटही बनविलेला आहे.

आपल्या समुहाकडून सुदेश भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..