नवीन लेखन...

मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर

मनसेचे जेष्ठ नेते व राज ठाकरे यांचे विश्वासू व खंदे समर्थक बाळा नांदगावकर यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला.

बाळा दगडू नांदगावकर हे त्यांचे पूर्ण नाव. बाळा नांदगावकर हे मनसेचे महत्त्वाचे नेते आणि राज ठाकरे यांचा उजवा हात समजले जातात. राज ठाकरे यांची अनेकांनी साथ सोडली, मात्र बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले व आज ही बाळा नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे दोन नंबर चे नेते आहेत. त्यांचे बालपण माझगावातल्या ताडवाडीत गेले. सामाजिक सेवेचे बाळकडू त्यांच्यामध्ये लहान पणा पासूनच होते.त्यांना सामाजिक सेवेचे संस्कार बाळासाहेब ठाकरे यांच्या कडून मिळाले होते. पहिल्याच्या बाळा नांदगांवकर हे नगरसेवक झाले ते साहेबांच्या आशिर्वादाने, त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची जाण ठेवून त्यांना शिवसेनेने आमदारकी दिली.

१९९५ ची निवडणूक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता. माझगांवातल्या या निवडणुकीत छगन भुजबळ हे प्रस्थापित राजकिय नेते त्यांच्या विरुध्द होते. त्यांना बाळा साहेबांनी निवडणूक रिंगणात उतरवले होते. माझगांवकरांच्या आशिर्वादाने, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, पदाधिकाऱ्याच्या मुळे ते छगन भुजबळ यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकले. बाळा नांदगांवकर या नावामागे जायंटकिलर ही उपाधी लागली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या ह्या निवडणुकीमुळे बाळा नांदगांवकर यांच्या अवती भवती प्रसिध्दीचे वलय निर्माण झाले. त्या नंतर त्यांनी माझगांवचे सतत ३ वेळा प्रतिनिधित्व केले होते.

युती शासनाच्या काळात त्यांना गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना मिळाली. पुढे २००६ मध्ये समज-गैरसमजाच्या राजकारणाने एक वेगळाच नूर पालटला होता. दस्तरखुद्द शिवसेना पक्षातीलच एक ज्येष्ठ तरुण उमदे व्यक्तीमत्व राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा कौल घेवून ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. मनाच्या कोंडमाऱ्यातून एक नवं परिवर्तन बाळा नांदगांवकर यांच्याही आयुष्यात घडून आले. ते राज ठाकरे यांच्या सोबत काम करू लागले. व बघता बघता ते मनसेचे २ नंबरचे नेते झाले. त्यावेळी राजसाहेबांबरोबर तत्कालीन आमदार म्हणून फिरणारा ते एकटेच होते.

राज्य सरकारच्या कारभारावर वचक ठेवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मार्च २०२० मध्ये शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती. यात बाळा नांदगावकर यांच्याकडं गृहखात्याची जबाबदारी देण्यात आली होती.

बाळा नांदगावकर यांना २००४ मध्ये बाळा नांदगांवकर यांना कार्याची दखल घेत राज्य सरकारने त्यांना उत्कृष्ट संसदपटू चा पुरस्कार बहाल केला होता. महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक संघाचा ‘आदर्श लोकसेवक पुरस्कार, भारतीय दलित साहित्य अकादमीचा ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार २०१० असे पुरस्कार बाळा नांदगावकर यांना मिळाले आहेत. तसेच त्यांची प्रजा फौंडेशनच्या सर्वेक्षण अहवालात सर्वाधिक लोकप्रिय आमदार म्हणून सलग चौथ्या वर्षी बाळा नांदगावकर ह्यांची निवड झाली होती.

बाळा नांदगावकर यांची राजकीय कारकीर्द.

१९९२ नागपाडा प्रभागातून शिवसेना नगरसेवक म्हणून निवड. १९९३ नगर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत. १९९५ शिवसेनेच्या वतीने माझगावचा आमदार म्हणून निवड. १९९९ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून कार्यभार. १९९९ आमदार पदावर पुन्हा निवड. २००४ आमदार पदावर सलग तिसऱ्यांदा निवड. २००९ मनसेचा आमदार म्हणून चौथ्यांदा निवड.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..