ज्येष्ठ संगीतकार तिमिर बरन यांचा जन्म १० जुलै १९०४ रोजी झाला.
तिमिर बरन हे प्रतिभावान संगीतकार आता विस्मृतीत गेले आहे आणि ते आजच्या पिढीला माहिती पण नाहीत,पण त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत खूप काम आहे. तिमिर बरन यांचा जन्म एका संस्कृत विद्वानांच्या कुटुंबात झाला. तिमिर बरन हे उत्तम प्रशिक्षित शास्त्रीय कलावंत होते. मैहर घराण्याचे उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडून शिक्षण घेतलेले तिमिर बरन सरोद, शहनाई आणि बँजो वाजवण्यात निपुण होते. ते राधिकाप्रसाद गोस्वामी यांच्याकडून सरोद शिकले आणि नंतर १९२० मध्ये ते उस्ताद अलाउद्दीन खान यांचे पहिले विद्यार्थी झाले, त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांमध्ये उस्ताद अली अकबर खान आणि पंडित रविशंकर हे ही होते.
तिमिर बरन यांनी आपल्या सरोद वादनाचे कार्यक्रम संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत केले तेव्हा त्यांनी तेथे वाद्यवृंद बघीतले असता बरान यांना आपण फक्त भारतीय वाद्य घेऊन भारतीय वाद्यवृंद असे वाटले या साठी त्यांनी ४० प्रशिक्षित कलाकार तयार केले. या भारतीय वाद्यवृंदाने नर्तक उदय शंकर यांचे लक्ष वेधून घेतले, जे पश्चिमेकडील संपूर्णपणे नवीन नृत्य प्रकार सादर करण्याचा प्रयत्न करीत होते. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला.तिमिर बरन यांना ‘भारतीय हार्मोनिक ऑर्केस्ट्राचे जनक’ म्हणून देखील ओळखले जाते.
कलकत्ता येथील रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनच्या संगीत शाखेसाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले होते. आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘द चाइल्ड’ या कवितेवर आधारित, त्यांच्या सर्वात प्रसिद्ध हार्मोनिक रचनांपैकी एक, शिशुतीर्थ, १९३६ मध्ये रचली गेली आणि ती प्रसिद्ध झाली. रवींद्रनाथ टागोरांनीही त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.
संगीतकार म्हणून तिमिर बरन हे कलकत्ता येथील न्यू थिएटर्सच्या तीन संगीत दिग्दर्शकांपैकी (आरसी बोरल आणि पंकज मलिक) एक होते. त्यांनी १९३५ मध्ये न्यू थिएटर्सच्या देवदास चित्रपटासाठी संगीत दिले. के एल सहगल यांनी गायलेले “बालम आओ बसो मोरे मन में” आणि के सी डे यांनी गायलेले “मत भूल मुसाफिर” ही या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत. संगीतकार खेमचंद प्रकाश त्यावेळी न्यू थिएटर्समध्ये सामील झाले होते आणि देवदास चित्रपटामध्ये त्यांनी तिमिर बरन यांचे सहाय्यक म्हणून काम केले होते. त्यांच्या इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये १९३६ मध्ये आलेला ‘पुजारिन’ चा समावेश आहे, ज्यात के.एल.सहगल यांनी “जो बीत चुकी सो बीत चुकी अब उसकी याद सातये क्यूं”, १९३८ मध्ये आलेला ‘अधिकार’ ज्या मध्ये पंकज मलिक यांनी “बरखा की रात” गायले आणि पहाडी सन्याल यांनी गायलेले ” सुहाग की रात” ही गाणी पण गाजली. त्यांचे १९४० मध्ये प्रदर्शित झालेले ‘दीपक’,’कुमकुम’,’लक्ष्मी’ आणि ‘सुहाग’ हे इतर उल्लेखनीय हिंदी चित्रपट होते. त्यांनी १९४१ मध्ये ‘राज नर्तकी’ साठी संगीत दिले. १९४९ मध्ये पृथ्वीराज कपूर आणि साधना बोस अभिनीत होमी वाडिया निर्मित पहिल्या पूर्ण लांबीच्या इंग्रजी भाषेतील चित्रपट सम्पति साठी संगीत दिले.१९३५ ते १९४९ या काळात त्यांनी नऊ चित्रपटांना संगीत दिले होते.
तिमिर बरन यांनी बिजॉया (१९३५), उत्तरायण (१९४१), बोन्दिता (१९४५), बिचारक (१९५९), थाना थेके अश्ची (१९६५), दिबा रात्रिर काब्य (१९७०) आणि डाक दियाजई (१९७८) यांसारख्या अनेक बंगाली चित्रपटांसाठी संगीत दिले.
तिमिर बरन यांचे २९ मार्च १९८७ रोजी निधन झाले.
Leave a Reply