गंधर्व नाटकमंडळी मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या हरिभाऊ देशपांडे यांनी बालगंधर्वांच्या अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती. संगीताची आवड असलेल्या बालगंधर्व यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते.
हरिभाऊ देशपांडे यांची तीन मुले – चंद्रशेखर, संजय आणि अनिल ही तिघेही उत्तम ऑर्गन वाजवतात. चंद्रशेखर देशपांडे गायकही आहे.
हरिभाऊ देशपांडे यांनी नाट्यसंगीत गाणारे अनेक शिष्य तयार केले. लालजी देसाई, मोहिनी पेंडसे-निमकर, आनंद भाटे हे त्यांपैकी काही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला पुण्याच्या जॉली क्लबच्या हॉलमध्ये हरिभाऊंचे शिष्य गात असत. सर्व शिष्यांचे गाऊन झाल्यावर पहाटे साडेचार वाजता स्वतः बालगंधर्व गायला बसत.
हरिभाऊ देशपांडे यांचे २३ जून १९८२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply