ज्येष्ठ निर्माता, नाटककार आणि कलाकार संघाचे आधारस्तंभ असलेले शेखर ताम्हाणे यांचा जन्म १७ जानेवारी १९५३ रोजी झाला.
‘सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘नकळत सारे घडले’ या सारखी नाटके शेखर ताम्हाणे यांनी लिहिली. तसेच त्यांनी ‘कलकी’, ‘ट्रॅक’ यासारख्या गाजलेल्या मालिकाचे लेखन केले होते.त्यांची ‘आगंतुक’ कादंबरीचा पण गाजली होती.
१९८५ साली व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या शेखर ताम्हाणे यांच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
शेखर ताम्हाणे यांनी नाटकांबरोबरच अनेक एकांकिकादेखील लिहिल्या होत्या. नाटककार म्हणून त्यांना सामाजिक भान होते. कोरोनाच्या काळात नाट्यकर्मींसाठी मदत निधी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. नाट्यलेखक म्हणून लोकप्रिय असलेले ताम्हाणे पर्यावरण अभियांत्रिकी विषयातही निपुण होते, अल्ट्राटेक पर्यावरणीय कन्सल्टन्सी आहे.
१९ एप्रिल २०२१ रोजी ताम्हाणे यांच्या पत्नी उमा यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे हे त्यांचे बंधू होत.
शेखर ताम्हाणे यांचे २८ एप्रिल २०२१ रोजी कोरोनामुळे निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply