बिंदू माधव पाठक यांचा जन्म ९ एप्रिल १९३५ रोजी झाला.
बिंदू माधव पाठक हे रुद्र वीणा आणि सतार वादन करत असत.ते ख्याल शैलीचे वादन करत असत. पाठक हे ज्येष्ठ रुद्र वीणा वादक पं. दत्तो पंत पाठक यांचे पुत्र होत. त्यांनी सुरुवातीचे प्रशिक्षण त्यांच्या वडिलांकडून आणि नंतर देवास येथील रजब अली खान यांच्याकडून घेतले. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी स्वंतत्र वादन केले होते. ते ऑल इंडिया रेडिओचे ‘ए’ दर्जाचे कलाकार होते. हिंदराज दिवेकर, श्रीकांत पाठक, रामचंद्र व्ही हेगडे आणि ज्योती हेगडे हे त्यांचे काही प्रसिद्ध विद्यार्थी आहेत.
बिंदू माधव पाठक यांना कर्नाटक कला टिळक पुरस्कार, श्री कनक पुरंधर प्रशस्ती, आर्य भट पुरस्कार आणि “विद्यापरिपूर्ण” असे अनेक पुरस्कार मिळाले होते. बिंदू माधव पाठक हे कर्नाटक विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले.
बिंदू माधव पाठक यांचे ४ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply