ज्येष्ठ गायिका कांचन शहा यांचा जन्म १६ मार्चला झाला.
बाबला वीरजी शहा, हे जे संगीतकार आहेत ते कल्याणजी आनंदजी ह्या नामवंत संगीतकार जोडीचे छोटे भाऊ आहेत.
ह्या बाबला नावाची जादू होती एकेकाळी … ८० चे दशक गाजवले होते बाबला व कांचन ह्या जोडीने … कांचन शहा..मुळच्या कोल्हापूरच्या… माहेरचे नांव कांचन माळी.
ह्या जोडीने भारतातला हा गुजराथी लोकसंगीताचा प्रकार जगभर प्रसिद्ध केला, नुसताच प्रसिद्ध केला नाही तर डिस्को दांडिया ह्या संगीत प्रकाराचा जन्म किंवा उगम ह्या बाबला व कांचन ह्या जोडीने च केला.
बाबला यांनी अनेक चित्रपटांना संगीत सुद्धा दिले. बऱ्याच संगीतकारांना सहाय्यक म्हणून काम केले. बाबला शहा पती, पत्नीने आफ्रिकन,केरेबियन देशात व इतर देशात बाबला ऑर्केस्ट्रा नावाने मोठे मोठे स्टेज शोज केले. बाबलाच्या संगीत निर्दशनात चटणी सारख्या सुपरहिट अल्बम चा समावेश आहे. तसेच त्यांनी अनेक गाजलेली गीते आपल्या हिंदी सिनेमा सृष्टीला दिली आहेत,त्यात कुरबानी चित्रपटातील सुपरहिट गाणं ”लैला में लैला’…,किंवा डॉन मधील खैके पान बनारसवाला व येह मेरा दिल अशी सुपरहिट गाणी बाबला शहा यांनी आपल्याला दिली आहेत. संगीत वाद्यांचे अनेक प्रकार भारतात आणण्याचे श्रेय सुद्धा बाबला यांनाच जाते. शिवमनी सारखा आजचा प्रसिद्ध ड्रमर त्यांचा चाहता आहे,ए आर रहमान हा दिग्गज संगीतकार पण बाबलाच्या योगदानाबद्दल बोलत असतो. बाबला यांना दोन अपत्य आहेत,एक मुलगा व एक मुलगी निशा अन वैभव त्यांची नावे आहेत. त्यांची कन्या निशा आईची गाणी म्हणतात व वैभव बालपणापासून ड्रम वाजवत आहे.
कांचन शहा यांचे २६ जुलै २००४ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=oMODo1o8WoE&list=PL9bk1lb28B_Viz2fPgCp-wiFaaXYFX2uz&index=2&t=0s
https://www.youtube.com/watch?v=Yrp9uC799ok
https://www.youtube.com/watch?v=J5k682RQS-0&list=PL9bk1lb28B_Viz2fPgCp-wiFaaXYFX2uz&index=2
https://www.youtube.com/watch?v=Ysnip-5ijxo
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply