नवीन लेखन...

ज्येष्ठ गायिका प्रमिला दातार

प्रमिला दातार यांचा जन्म १४ जानेवारी १९४२ रोजी झाला.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ‘सुनहरी यादें’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असे. आतापर्यंत या वाद्यवृंदाचे ४००० च्या वर कार्यक्रम झाले आहेत. यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येईल. या वाद्यवृंदाच्या प्रवर्तक व संचालिका आहेत प्रमिला दातार. शास्त्रीय/उपशास्त्रीय पद्धतीवर आधारित गीते, नाट्यगीते व लोकप्रिय हिंदी गीते अशा विविवधेतेमुळे ‘सुनहरी यादे’ हा कार्यक्रम त्या वेळी अधिकाधिक लोकप्रिय होत गेला.

प्रमिला दातार या माहेरच्या प्रमिला जोशी. प्रमिला यांना शाळेपासूनच गाण्याची स्टेजची आवड. शाळेत असतानाच नवरंग यांच्या कडे शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी घेतले व त्याचा उपयोग पुढे त्यांनी संगीत नाटकात काम केले तेव्हा झाला. प्रमिला दातार यांनी त्यावेळी संगीत सौभद्र मध्ये नारद, संगीत शारदा मध्ये कोदंड, संगीत स्वयंवर मध्ये कृष्ण अशा वेगवेगळ्या भूमिका रंगवल्या. त्यांना संगीत शारदा मधील कोदंडाच्या भूमिके करता महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत वैयक्तीक अभिनयाचं पारितोषिक मिळालं होते. पुढे संगीत विषय घ्यायचा म्हणून एसएनडीटी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला त्यांनी संगीतात बी ए केले.

बी ए झाल्यावर प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक महत्वाचा टप्पा येतो त्यानुसार श्री दातारांशी त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचे वय होते फक्त सोळा. पुढे रितीप्रमाणे संसार सुरू झाला. १९६२ साली पहिले कन्या रत्न झाल्यावर श्री दातारांच्याच आग्रहावरून त्यांनी एम ए ला प्रवेश घेतला. दोन वर्षांनी त्यांनी संगीत विषयात मास्टर्सची डिग्री मिळवली. काही काळ त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर यांचेकडे घेतले.

पुढे संसारात स्थिर झाल्यावर स्टेजची ओढ स्वस्थ बसू देईना म्हणून प्रमिला दातार यांनी लहान मोठे स्टेज प्रोग्रॅम सुरू केले. चार पाच वर्षे ते करून झाल्यावर त्यांचा चळवळया स्वभाव स्वस्थ बसु देईना, त्यांना काहीतरी मोठं करायची इच्छा होती.स्टेज प्रोग्रॅम करत असताना व महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी त्यांना हिंदी गाण्यांची फर्माईश होत असे, म्हणून त्यांनी मोठा वाद्यवृंद बरोबर घेऊन ‘सूनहरी यादे’ हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम सुरू केला.

कुठलंही नवीन काम सुरू केल्यानंतर जशा अडचणी येतात तश्याच आल्या. गाठीशी तसा अनुभव कमी…त्यामुळे बरेच टक्के टोणपे खात खात त्यांनी आपला कार्यक्रम चालू ठेवला. त्या वेळी जणू काही प्रत्येक येणारा शो म्हणजे एक नवीन चॅलेज असे पण एक दोन वर्षातच हळू हळू जम बसत गेला.आणि त्या वेळी ‘सूनहरी यादेचे सरासरी महिन्याला वीस शो होत असत. याचे १९७५ ते २००० पर्यंत शो केले आणि आज पर्यंत जवळ जवळ ४००० च्या आसपास शो झाले.

प्रमिला दातार यांनी ज्येष्ठ गायक तलत महमूद यांच्याबरोबर परदेशात वेस्ट इंडिज, जमेका आणि शेवटी लंडन अनेक यशस्वी दौरे केले. हे सर्व चालू असतानाच रफी साब… किशोर कुमार जी…मन्ना डे यांच्या सारख्या महान गायकांबरोबर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले. १९७५ ते १९८० च्या काळात त्यांना दोन महागुरू भेटले. एक म्हणजे प्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र व त्या वेळचे आघाडीचे संगीतकार वसंतराव देसाई. सी.रामचंद्र यांच्या ‘गीतगोपाळ’ या कार्यक्रमात त्यानी अनेक गाणी गायली. तसेच वसंत देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली त्यानी अनेक हिंदी व मराठी गाणी गायली. त्यांच्या आवाजातील गोडवा व ढंग इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.

प्रमिला दातार यांची गाजलेली गाणी म्हणजे पप्पा सांगा कुणाचे ? व नंबर फिफ्टि फोर हि होत.

प्रमिला दातार यांना ‘बायांनो नवरे सांभाळा’ यातल्या गाण्याकरता सूर सिंगार संसद या संस्थेचे मियाँ तानसेन पुरस्कार मिळाला होता.

२००१ मध्ये प्रमिला दातार यांनी शो करणे बंद केले. त्या नंतर मोठी गॅप पडली. हल्ली हल्ली गेले जवळ जवळ दीड वर्ष बरेच अनुभव त्या रसिकांबरोबर सोशल मिडिया वर शेअर करत असून या बरोबर रोज एक गाणं पण पाठवत आहेत .
प्रमिला दातार यांचा आता विचार आहे की हे सर्व पुस्तक रूपाने आपल्या समोर ठेवावं.

https://www.youtube.com/watch?v=Spmoo1mt8Vk

https://www.youtube.com/watch?v=ZJVVR3LropI

https://www.youtube.com/watch?v=m5AS3kHXPuM

https://www.youtube.com/watch?v=vbGcyLQTCyc

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/ म.ना. काळे

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..