लाखोल्या अन् शिव्या शाप ते, देत सूटतो कुणी रागाने
शब्दांचा भडीमार करूनी, तिर मारीतो अती वेगाने
बोथट बनूनी विरून जाती, निकामी होई शब्द बिचारे
स्थितप्रज्ञाचे बाह्य कवच ते, परतूनी लावी त्यांना सारे
स्थितप्रज्ञाचे कवच तूटते, अहंकार तो जागृत होता
शब्दाने परि शब्द वाढते, वादविवाद हा होऊन जाता
शब्द करिती अघाद मनी, होवून जाते जखम तयांची
काल ओघाने विरती शब्द, परि निशानी राहते कायमची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply