भावशब्द कां? निःशब्द
अव्यक्त कां? मनभावनां
शब्दाविना कसे उमगावे
सत्यार्थ अनंताचे सांगना…
तव दर्शना आसक्त अंतरंग
मनास, शांतवु कसे सांगना
नाव तुझेच नित्य वैखरीवरी
मौनात उच्चारु कसे सांगना…
तव भक्तीरंगात मी दंगलेला
दयाळा आळवु कसे सांगना
शब्द, स्वर, सूर घुटमळलेले
तुझ्याच नामस्मरणी गुंतताना…
घुमते, मधुरम हरिची पावरी
देवा तुला शोधू कुठे सांगना
लोचनात, कैवल्य रूप तुझे
शब्दाविना नटवू कसे सांगना….
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५७
१३/१०/२०२२
Leave a Reply