प्रत्येक वेळी हुंदक्यांनी भरलेलं मन डोळ्यातल्या पाण्यानेच रितं होतं असं नसतं..
जेव्हा केव्हा आपल्याला खूप हताश निराश वाटतं तेव्हा आपण सर्वात आधी मंदिराची पायरी चढतो. देवाकडे प्रार्थना करतो की आपल्याला त्या संकटातून निघण्याचा मार्ग दाखवावा. पण तरी देखील आपल्याला आपल्या श्रद्धेवर पूर्णपणे विश्वास नसतो, त्यामुळे आपल्याला शाश्वती नसते की सर्व ठीक होऊ शकतं. पण खरे पाहता जर आपण देवावर श्रद्धा ठेवत असू तर आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवायला देखील शिकलं पाहिजे.
हळव्या मनाच्या माणसाला नेहमीच वेदनेचा शाप असतो आणि हा शाप सुद्धा पदरांत घेत जगण्याची सवय झाली पाहिजे. प्रत्येक वेळी हुंदक्यांनी भरलेलं मन डोळ्यातल्या पाण्यानेच रितं होतं असं नसतं म्हणून काही वेळा शब्दांचा आधार घ्यावा लागतो.
आपल्या आस पास अनेक असे लोक असतात ज्यांना निव्वळ बडबड करता येते, म्हणजे ते कधीही कोणाचं ऐकून न घेता स्वतःच बोलत बसतात. अशी अनेक लोक आपण बघत असतो. पण कधीही बोलायच्या आधी समोरची व्यक्ती काही बोलू इच्छिते का ? हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. म्हणजे विनाकारण बोलण्याआधी समोरच्याचं ऐकून घ्यावं. ह्याने लोक दूर न जाता जवळ येतात आणि आपल्याला इतरांबद्दल जाणून देखील घेता येते.
असंख्य माणसांच्या गर्दीत न दिसणाऱ्या जाणीवा जाणवू लागल्या की मग, त्या निस्वार्थ भावनेनं आपल्या माणसा समोर व्यक्त होता यायला हवे…
माणसांच्या व्यक्तीगत जिवनाचा लढा प्रत्येक माणूस स्वतःचं लढत असतो पण भावनेची सांगड जमली की माणूस त्या भावनेत स्वतःचं अस्तित्व शोधत फिरत राहतो. रोजच्या जगण्यात रोज पडत उठत आणि स्वतःच्या आजाराला सांभाळत माणसाने जमेल तस रितं व्हावं, माणसं स्वतःचं स्वतःची प्रेरणा असतात. प्रत्येक वेळी हरताना.. ‘जिंकायला उभं करणारा प्रत्येक क्षण’ सर्वांनी जगलेला असतो…
“माणसाने स्वतःला व्यक्त करावे व खुलून जगावे .. हेच आहे जगण्यातलं रहस्य ……..”