नवीन लेखन...

शब्दसौंदर्य..

“आपल्या भावना दुसऱ्यांना आपल्या वाटाव्यात, इतक्या जवळच्या शब्दातून मांडता येणं म्हणजे कदाचित लिहिणं …”

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जन लोका ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करू ॥३॥
~ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
 
बालपणी शब्द आणि धन हे समीकरण सहसा मनाला पटायचंच नाही. हे कसचं धन..? शब्दांनी का आपल्याला एखादी वस्तू मिळते..? का हौसमौज होते..? यासाठी तर खण खण वाजणारा पैसाच हवा ना. त्यावेळी शब्द, रत्न आणि धन याचा मेळ लागता लागत नसे.
 
पण शब्दांच्या सागरात आपले मन सुखेनैव विहार करू लागले की, शब्दरत्नांनाच ‘कधीच न रिते होणारे भांडार’ समोर उघडलं जाते. खणखण वाजणारा पैसा क्षणिक सुख देणारा, वासना वाढविणारा आहे याची जाणीव होत जाते. शब्दरत्न आनंदाचा डोह होतात. संत, महंत, कर्मयोगी, ज्ञानयोगी अशा माणसांनी उच्चारलेले शब्द यांना रत्नांची चमक आलेली पाहून त्या धनाची जाणीव होऊ लागते. धबधब्यासारखे कोसळणारे शब्द, रातराणीतून झिरपणाऱ्या चांदण्यासारखे शब्द, काटेरी शब्द, हळुवार मोरपिसासारखे शब्द.. कधी बिलगणारे, कधी कान धरणारे, कधी आई होऊन दृष्ट काढणारे शब्द आणि कधी बाई होऊन वेड लावणारे शब्द. कधी हातात हात घेऊन काही पावलं चालतात आणि मग आपल्या वाटेनं निघून जातात. कधी नुसतंच लांबून हसून निघून जाणाऱ्या अल्लड पोरीसारखे हुरहुर लावून जातात. आणि कधी मात्र असे सुटतात या शब्दांचे बाण, या ओळी, या कल्पना; की बाण आरपार जावा, जखमही दिसू नये, वेदनेची मजा यावी, आणि ती जखम आयुष्यभर जपून ठेवावी.
 
कवी, गीतकार आपले विचारांचे निखळ सौंदर्य काव्यातून व्यक्त करत असतो. आणि रसिक श्रोता एखादी संगीतरचना तल्लीन होऊन ऐकताना आपल्या भावविश्वात रमत जातो, एक प्रकारची धुंदी त्याला चढलेली असते. नादयुक्त शब्द तो मनात साठवण्याचा प्रयत्न करत असतो. शब्द हे भाषेचे अलंकार आहेत. कोणत्याही भाषेच सौंदर्य आणि सामर्थ्य शब्दांवर अवलंबून असतं. शब्दाचे सौंदर्य म्हणजे आत्मदेवाची भाषा होय. शब्दांचा पसारा हा मोरपिसाऱ्यासारखा मनमोहक असतो. शब्दांना मोठी किंमत असते. शब्द हाच फार मोठा विश्वास आहे. शब्दनिष्ठ माणसं जग जिंकू शकतात शस्त्राविना, याचा प्रत्यय आपण इतिहासात पाहतो. मराठी भाषा ही सामर्थ्य संपन्न, विचारगर्भ, प्रबोधनात्मक आणि आनंददायक आहे. आपण आपल्या भाषेचे वैभव हे जपलेच पाहिजे.
 
असं शब्दधन रत्नासारखं जपून वापरावं. शब्दधनाला रत्नाची चमक आणि निष्ठेचं आवरण घालावं आणि धनवान व्हावं..!
शब्दसौंदर्य..
©Shyam’s Blog

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..