नवीन लेखन...

शहाणी आणि समंजस

गेल्या पंधरवडय़ात एका लग्नासाठी मुलगा सूनबाई परगावी गेले होते तेव्हा नातवाची माझ्या कान्हाची ऑनलाईन परीक्षा होती म्हणून तो गेला नाही. आणि मला खूप दडपण आले होते. मी अशी शिवाय यांची गुडघे दुखी मावशीबाई होत्या पण संध्याकाळी जातात तेंव्हा त्याची जबाबदारी पार पाडणे अवघड आहे असे वाटत होते. पाच वाजता तो मित्रा सोबत मैदानावर क्रिकेट खेळायला गेला होता. तो येईपर्यंत मला अवघडच गेले. आल्या वर कपडे बदलून हातपाय धूवून माझ्या कडे आला होता म्हणाला की आज्जी मी आलो फ्रेश झालो आहे. अरे पण तू आता काय खाणार आहेस तर म्हणतो कसा नो प्रॉब्लेम मी चिप्स खातो आणि तू नको टेन्शन घेऊ मी सगळे हॅंडल करतो(वय फक्त अकरा वर्षे) . यांनी जेवायला वाढले जेवण झाल्यावर मित्राला फोन करून बोलावून घेतले व दोघेही गप्पा मारत झोपले. आणि तेही दार लावून.. हॅंडल करणे म्हणजे काय हे मला उभ्या आयुष्यात समजले नाही.
चारपाच वर्षे झाली तेंव्हा त्याची आई परदेशात गेली होती कंपनीच्या कामासाठी त्याच्या बाबांनी त्याचे आवरुन दिले होते पण डबा मात्र मी यांना मदतीला घेऊन एका हाताने करुन दिला होता पण आता मी काहीही करू शकत नाही म्हणून वाईट वाटते. आणि खरच आईबाबा येईपर्यंत तो खूपच जबाबदारीने वागला. आणि कौतुक वाटले की आत्ताची मुले खरच शहाणी बुद्धीमान आहेतच पण समंजस जास्त आहेत. टिव्ही वर पाहिले आहे की किती लहान वयातील मुले गाताना किती संमजस पणे अगदी मोठ्या गायका गायिका सारखे हातवारे. ठेका. सूर ताल. लय सगळेच सांभाळून अगदी धीटपणे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसमोर परिक्षका समोर. मालिका. सिनेमात काम करतात. पैसा प्रसिद्धी मिळवतात. ज्या वयात आम्ही कविता फक्त पाठ करणे एवढेच माहीत होते पण आता याच वयातील मुलांना कविता. लेख करता येतात. शाबासकी मिळवतात कौतुक केले जाते. लांबचे प्रवास. मॉल. हॉटेल कुठे तरी कमी पडतात का? आईबाबा कामाला गेले की घरात एकटेच असतात तेंव्हाही सावधानता ठेवतात. आणि मुख्य म्हणजे शिक्षणासाठी लहान वयातच मोठ्या शहरात अनेक अडचणींना तोंड देत राहतात. एकत्र कुटुंबात असे घडत नव्हते आईबाबा नसले तरी इतर मायेची माणसं होती. अगदी परदेशात सुद्धा मुला प्रमाणेच मुली पण शिक्षण घेऊनही नोकरीच्या ठिकाणी मोठय़ा पदावर कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातही आवडीने लक्ष घातले आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याची यादी मोठी आहेच. त्यामुळे मान्य केले पाहिजे की खरंच ही आजची पिढी समंजस आहे म्हणूनच हॅंडल करतात माझ्या नातवाने मला शहाणे करून पटवून दिले आहे की टेन्शन लेने का नही. त्यामुळे मी त्याचे व या पिढीचे अगदी मनापासून कौतुक करते. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद देऊन नातवाने शिकवले आहे ते कधीच विसरणार नाही…
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..