नवीन लेखन...

प्रख्यात अभिनेत्री शकिला

प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी झाला. सीआयडी, आरपार, रेशमी रुमाल, श्रीमान सत्यवादी अशा एकाहून एक सरस कृष्णधवल हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचे “बाबूजी धीरे चलना’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे व त्यांच्या भूमिकाही चित्रपट रसिकांच्या मर्मबंधातली ठेव होती. गुरुदत्त यांच्या आरपार व सीआयडी या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. शक्ती सामंता यांच्या चायना टाऊन या चित्रपटात शम्मी कपूर यांच्या सोबत शकिला यांनी भूमिका केली होती.

पोस्ट बॉक्स ९९९ या चित्रपटातील शकिला यांची अदाकारी लाजवाब होती. त्यांनी १९६३ साली चित्रपट संन्यास घेतला होता. शकिला या जॉनी बार्बर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या. लग्नानंतर त्या आपल्या पतीबरोबर लंडन येथे गेल्या. जॉनी बार्बर यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. शकिला यांना मीनाझ नावाची एक मुलगी होती. मीनाझचे १९९१ साली निधन झाले होते. मनोजकुमार, राज कपूर, देव आनंद, सुनील दत्त या अभिनेत्यांबरोबरही शकिला यांनी विविध चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. शकिला यांचे २१ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

शकिला यांचे चित्रपट.
दुनिया (१९४९), दास्तान (१९५०), अरमान (१९५३), मदमस्त (१९५३), शहनशाह (१९५३), आगोश (१९५३), आरपार, दान, हल्लागुल्ला, गुलबहार, खुशबू, लैला, लाल परी, अलिबाबा ४० चोर, नूरमहल (१९५४), मस्त कलंदर, रत्नमंजरी (१९५५), सीआयडी, कारवाँ, हातीमताई, झाँसी की रानी, मलिका, पैसा ही पैसा, रुपकुमारी (१९५६), बेगुनाह, नागपद्मिनी, परिस्तान, आग्रा रोड (१९५७), अल हिलाल, चौबीस घंटे, पोस्ट बॉक्स नं. ९९९ (१९५८), फोर्टी डेज, गेस्ट हाऊस, काली टोपी लाल रुमाल, स्कूल मास्टर (१९५९).

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..