बुद्धिमान असणे, विचार करणे हा शाप आहे कि वरदान..
जुना विषय आहे परंतु आज त्याचे निश्चित स्वरूव काय
असा प्रश्न मला तिने विचारला तेव्हा मला जाणीव झाली स्वतःला होणाऱ्या त्रासाची.. ताण याची..
ती तिचा मार्ग आक्रमत होती, मी माझा पण आम्ही सतत भेटत होतो…
विचारांची देवाणघेवाण करत होतो..
अचानक ती म्हणाली मी आता कुठलासा ताण घेणार नाही.. दुसऱ्या अर्थाने.. निर्लज्ज रहाणार.. मला तिचे म्हणणे पटले…
मग मात्र आम्ही कायमचे एकत्र झालो
आयुष्याचा प्रवास आता उत्तम आहे.. जरी जग रडत असॆ तरी..
ती तीच आहे..
दुसरी तिसरी कोणी नाही..
माझ्या
मनातील
निर्लज्ज
आत्तापर्यंत
सुप्त असणारी
शक्ती…
— सतीश चाफेकर.
Leave a Reply