शक्ती, युक्ती, भक्ती कैसी
महारुद्र दाखवुनी गेला
समर्थ म्हणती प्रभू दर्शने
गुरू देखिला दास संतुष्ट झाला!!
अर्थ–
शिक्षक दिन!!
पण शिक्षक दिन साजरा करायला शिक्षकाची व्याख्या आधी समजून घेणे गरजेचे आहे. जो शिक्षा देतो तो शिक्षक, गुरू, प्राध्यापक इ. नावाने ओळखला जातो. पण आत्ताच्या आपल्या जगात मात्र गुरू किंवा शिक्षक म्हणजे केवळ जातीने वेढलेले चेहरे म्हणून पाहिले जातात आणि मुळ गुरू- शिक्षक यांना धाब्यावर बसवले जाते.
जो व्यक्ती आपल्याला घडवतो, आपल्यात असलेल्या गुणांची ओळख आपल्याला करून देतो आणि त्या गुणांना कसे वाढवायचे, कसे जोपासायचे, कसे वापरायचे हे शिकवतो तो शिक्षक असतो. येथे मी गुरू हा शब्द ही वापरतोय कारण बऱ्याच लोकांचा गुरू आणि शिक्षक याबद्दल वेगळा अर्थ होतो.
प्रभू श्रीराम यांच्या पुढे हात जोडून आसनस्थ असलेला मारुती आपण पाहतो. याचा अर्थ केवळ श्री प्रभुराम हे त्याचे गुरू होते असा अर्थ होत नाही. पण तेही होते हेही तितकेच खरे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पीर बाबा चे आशीर्वाद घेतले, संत तुकाराम यांच्या कडून मार्गदर्शन घेतले म्हणून ते त्यांचे गुरू असे संबोधले जाते. पण शाळेत शिकवणारे शिक्षक, कॉलेज मधे असणारे प्राध्यापक, तसेच लहानपणी खेळाच्या अकादमीत शिकवायला असलेले सर सुद्धा आपले शिक्षक किंवा गुरू स्थानिच असतात हे समजणे म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यांची पोच पावती आहे. आणि असे विद्यार्थी आताच्या जगात कमी असल्याने दादोजी कोंडदेव, श्री समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांच्या गुरू स्थानी नव्हते हे असत्य वारंवार बोलले जाते.
तत्वज्ञान शिकवणारा व्यक्तीच गुरू असतो असे नाही तर कधी कधी तत्व बाजूला ठेऊन आपल्यासाठी काहीही करणारा मित्र देखील गुरू स्थानीच असतो कारण गुरू देखील आपल्या शिष्यासाठी काही करू शकतो हे प्रभुरामचंद्र तसेच श्री हनुमान यांच्या कडे पाहून दिसते.
शेवटी काय शिक्षक दिन साजरा करा अथवा नका करू पण जगताना संतुष्ट होण्या साठी गुरू कोण आहे हे समजणे गरजेचे आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply