येवले – औरंगाबाद मार्गावर, म्हणजे येवल्या पासून तेरा मैलावर कोटम हे गांव असून, या ठिकाणी “महालक्ष्मी”, “महासरस्वती” व “महाकाली” या तीन देवींची मंदिरं आहेत; जवळपास ३५० वर्षांपूर्वीची ही मंदिरे असावीत असा अंदाज आहे, कारण त्याआधी बरीच मोडतोड या मंदिराची झाली व त्याच ठिकाणी नव्याने म्हणजे सध्याची मंदिरं बांधण्यात आली आहेत. शक्तीदेवी मंदिराच्या परिसरातच शंकराचं देऊळ व गाडीवानाचा मंडप, दीपमाळ, महाद्वार आणि सात मंडप पहायला मिळतात, नवरात्राच्या काळात येथे मोठा उत्सव आयोजित केला जातो.
— सागर मालाडकर
Leave a Reply