।।वक्रतुण्डाय नम:शमीपत्रं समर्पयामि ।।
पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती.
ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट व रूक्ष असते.८-१२ अवृन्त पत्रकांच्या जोड्या असलेली पाने असतात.पानांवर बारीक कण असतात.फुले लहान पिवळसर,५-७ सेंमी लांबीची व मंजीरी स्वरुपाची असतात.फळ १०-१५ सेंमी लांब,लंबगोल १०-१२ बिया असणारी शेंग असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फल.
आता ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
त्वचा: चवीला तुरट,कडू असते व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.
फल:चवीला गोड,उष्ण,जड व रूक्ष असते.
शमी ही कफपित्तनाशक आहे.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
सालीचा लेप हा विषनाशक आहे.
फळाची राख हि शरीरावरील रोमशातन अर्थात केस काढायला उपयुक्त आहे.मग ह्याचा वापर बायका हेअर रिमुव्हर म्हणून करू शकतील पण योग्य सल्ल्यानेच बरे.
शमी कृमिनाशक असल्याने जंतांमध्ये उपयुक्त आहे.
मुळव्याध,आवपडणे,जुलाब ह्यात देखील हिचा उपयोग होतो.
त्वचा रोगात हिच्या सालीचा लेप उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply