कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून पलुसकर यांनी त्यांना आपल्या बरोबर घेतले. पलुसकर यांनी स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात ९ वर्ष शिक्षण घेतले. नंतर ते अहमदाबाद येथील राष्ट्रीय विद्यालय येथे शिक्षक झाले. पलुसकर यांनी लाहोर येथे स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात प्राचार्य म्हणून गेले. १९३८ मध्ये शंकरराव व्यास हिन्दी फिल्म संगीतच्या क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. १९३८ मध्ये आलेल्या ‘पूर्णिमा’ या चित्रपटात काही गाणी गायली. गायना बरोबर चित्रपटातील रचना त्याच्या गाजू लागल्या होत्या. व्यास यांच्या संगीतबद्ध, भक्ति प्रधान गाणी लोकांना आवडू लागली होती १९४० मध्ये ‘सरदार’, ‘नरसी भगत’ व १९४२ मध्ये ‘भरतमिलाप’ या चित्रपटातील गाणी खूप गाजली. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
रामराज्य’चे दिग्दर्शक विजय भट्ट महात्मा गांधींना ‘रामराज्य’ दाखवायला घेऊन आले होते, पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले. महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली. सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पाश्र्वगायिका अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकीने केली होती. लव यशवंत निकम तर कुश मधुसूदन होते. प्रभातच्या ‘संत ज्ञानेश्वर’मध्ये याच यशवंताने बाल ज्ञानेश्वराची भूमिका केली होती. मन्ना डे यांनी हिंदी व मराठी या दोन्ही चित्रपटांत पाश्र्वगायन केले होते. हा चित्रपट गाजला तो शंकरराव व्यास यांच्या सुमधुर संगीतामुळे! विशेषत: रंजनावर चित्रित झालेल्या व सरस्वती राणे यांनी गायिलेल्या भीमपलासी रागातील ‘बीना मधुर मधुर कछु बोल’ या गाण्यामुळे! असा भीमपलासी गेल्या सत्तर वर्षांत परत कधी ऐकायला मिळाला नाही. त्यांना विजय भट यांच्या ‘रामराज्य’ या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. खरे तर हे गाणे के. सी. डे यांनी म्हणावे अशी संगीत दिग्दर्शक शंकरराव व्यास यांची इच्छा होती. पण के. सी. यांनी मन्नादांचे नाव सुचविले.
मन्नादांचा आवाज व्यास यांना आवडला. या चित्रपटाचे संगीतकार होते शंकरराव व्यास. या चित्रपटातील राग वर आधारित गाणी खूप लोकप्रिय झाली होती, ‘भारत की एक सन्नारी की हम कथा सुनाते हैं…’ ‘वीणा मधुर मधुर कछु बोल…’। शंकरराव व्यास यांनी ही दोन्ही गाणी राग काफी व भीमपलासी मध्ये रचली होती. व्यास यांची कुशलता केवळ फिल्म संगीत मध्ये नव्हती तर त्यांनी शास्त्रीय गायन, संगीत शिक्षण और ग्रन्थकार म्हणून काम केले. फिल्म के साथ कई उल्लेखनीय तथ्य जुड़े हुए हैं, जिनमें शंकरराव व्यास यांनी पार्श्वगायक मन्ना डे यांच्या कडून ‘रामराज्य’ चित्रपटातील गाणी गावून घेतली होती. शंकरराव व्यास यांचे १७ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply