जिथे नदी किनारी शंख-शिंपले शोधले
वाळूत खेळताना किती किल्ले बांधले // धृ //
त्या दिवसांची आठवण येता, तुला ना विसरावे
स्पर्श होता तुझ्या बोटांचा, पुन्हा सर्व आठवावे
परंतु हा भास आता, स्वप्न वाटे चांगले //१//
ते थोडेसे दिवस सुखांचे, भुर्रकन उडुन गेले
जीवनात सात रंगांचे – इंद्रधनुष्य बनवुन गेले
दिवस – रात्र, पुनर्भेटीचे वेध लागून राहीले //२//
दिवस गेले, ऋतू बदलले- प्रेम पुन्हा न झाले
तू सांगितलेल्या मार्गावरुन, जीवन निरंतर चाले
एक दिवस आहे मिलनाचा, हे हृदयी मी जाणले //३//
श्री. सुनील देसाई
२०/०६/२०२२
Leave a Reply