शांत मनाच्या डोहात
गूढ अगम्य साचले काही
कुणी पुसले नयन ओले
कुणी बाण विखारी मारले काही
संन्यस्त ऋषींच्या आश्रमी
थबकाव अंतरीचा झाला
पांथस्थ येता अवचित जीवनी
जीवनाचा आलेख कळला
ती मोहात गुंतली अलगद सीता
का पेटून उठली पांचाली होमात
धगधगले यज्ञकुंड ज्वाळानी
समिधा दोघींच्या पडल्या त्यात
अजूनही मुक्त कुठे न बाई
आई सांगून जाते स्त्री मर्यादा
अजूनही डोह काळोखी पाण्याचे
पाण्यावर तरंग काळा कसा उठला
ती पेटून उठते ज्वाला एक
ठिणगीत विखार एक भडकला
ती असते स्त्री बंध बेडीत
काळोख्या रात्री किती विस्कटल्या
प्रश्न अनेक मनात साचून गेले
वादळात पालापाचोळा भिरकला
गोल गर्त वादळ वारे पसरले
उध्वस्त किनारा तिचा ठाव मोडला
संध्या शामलवेळी शिकवून जाते आई
तमेच्या किर्र काजळ डोही वेदना डसतील काही
संस्कार अलगद घडता मनावर बाई
ओरखडे देऊन जाईल दुनिया सारी
उदात्त विचार व्यापले मनी निर्मोही शब्द काही
घरट्यात उमजले प्रेम मायगाठ मोठी
आईच्या शब्दांत उलगडले मर्म काही
एक कृष्ण तर एक रावण आहे दुनियेत अजुनी
निद्रिस्त मनाच्या कातर वेळा
संथ पाण्यात खळबळ का उठली
राऊळी वाजे घंटा शंखध्वनी मंगल
काहूरात विस्कटले विचार अबोध त्या वेळी
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply