वारा होता झंझावात पावसाचा माराही जोरात
जग गेले होते तेव्हा बुडून गडद अंधारात
कारागृहात एक तेजस्वी दिव्य बाळ जन्मले
बघूनी आईबापांचे काळीज गलबलून गेले
तो काळ येण्या आधीच सांभाळली ती वेळ
पण बाळाला लागता कामा नये त्याची झळ
पाऊस वारा विजांचा एकच होता मारा
तरीही टोपलीतील बाळासह धावत सैरावैरा
यमुनेलाही आला होता महा भयंकर महापूर
त्यातून तो निर्भय चालत राहिला दूर दूर वर
बाळाच्या पायाचा तिला झाला जेव्हा स्पर्श
पात्रातील पापं वाहून गेली याचा झाला हर्ष
आत्ताही ये ना रे तू याच दिव्य रुपात
कुठल्याही घरात वा पडक्या झोपडीत
त्याच्या दर्शनाने सगळे त्याला शरण जातील
आमची पापं नि चुका धुवून होईल सर्व शांत
लहर लहरपे आज है तुफान
वो नैयावाले हो सावधान
हे गोविंदा हे मुकुंदा संकट मे है हमारे प्राण
रक्षा करो रक्षा करो हे दयानिधान
धन्यवाद
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply