‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. शकील बदायूँनी यांचे वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक होते.
शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते. शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले.
शकील अहमद यांचे नाव चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याम उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील बदायूँनी यांची जोडी संगीतकार हेमंत कुमार यांच्या बरोबर चित्रपट सृष्टीत जास्ती जमली.
शकील बदायूँनी यांनी हेमंत कुमार यांच्या सोबत बेकरार कर के हमें यूं न जाइये.., कहीं दीप जले कहीं दिल.. जरा नजरों से कह दो जी.. निशाना चूक ना जाये, भंवरा बड़ा नादान है बगियन का मेहमान है, ना जाओ सइयां छुड़ा के बहियां, जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये.. अशी अप्रतींम गाणी दिली.
निर्माता-निर्देशक ए.आर.कारदार यांच्या चित्रपटात शकील बदायूँनी यांनी गाणी लिहिली होती. १९४७ मधील चित्रपट दर्द मधील गाणी शकील बदायूँनी यांनी लिहिली होती की जी सुपरहिट झाली होती. त्या नंतर या दोघांनी दुलारी, दिल्लगी, दास्तान, जादू, दीवाना, दिले नादान, दिल दिया दर्द लिया अशा चित्रपटासाठी एकत्र काम केले. शकील बदायूँनी यांनी गुरुदत्त, महबूब खान, के आसिफ, राज खोसला, नितिन बोस यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती.
दिलीप कुमार यांच्या मेला, बाबुल, दीदार, आन, अमर, उड़न खटोला, कोहिनूर, मुग़ले आज़म, गंगा जमुना, लीडर, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, संघर्ष व आदमी या चित्रपटांची गाणी शकील बदायूँनी यांची होती.
शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे १९६१ ते ६३ सलग तीन वर्षे फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९६० मध्ये चौदहवी का चांद या चित्रपटातील चौदहवीं का चांद हो या आफताब हो..१९६१ मध्ये ‘घराना’ या चित्रपटातील हुस्न वाले तेरा जवाब नहीं, व १९६२ मध्ये ‘बीस साल बाद’ या चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल या गांण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. शकील बदायूँनीयांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शकील बदायूँनी यांनी लिहलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=IQsJt6-8S7w
Leave a Reply