त्यावेळी मी लहान असताना आई-आजी समवेत आमच्या रानात राहायला होतो. या रानामध्ये माझे बालपण फार सुंदर गेले. हिरवीगार गर्द झाडी पाहावे तिकडे हिरवीगार शेती. आमच्या रानात भली मोठी असणारी आंब्याची 2 भली मोठी झाडे. ही आठवण अजून सुद्धा माझ्या स्मरणात आहे.
पूर्वीचे दिवस आठवले की माझं मन पुन्हा पुन्हा म्हणत. रानातील मोकळी स्वच्छ हवा वाऱ्यामुळे हलणाऱ्या झाडाच्या फांद्या. आंब्याच्या छायेतून तो पौर्णिमेचा चंद्र अजून मला आठवतो. चंद्राची शीतलता व रात्रीच्या वेळी मुका झालेला परिसर व झाडावरच्या पक्षांची किलबिलाट हे मी विसरू शकत नाही. याच शेतीमध्ये माझ्या आजीने वीस खंडी ज्वारी पिकवली होती. शेताच्या मध्यभागी ज्वारी मळण्यासाठी मोठे केलेले खळे. व बाजूला उभी केलेली कडब्याच्या ताटाचीखोप व या खोपीत प्रकाश म्हणून राकेल चा कंदील ठेवलेला असायचा. याच खोपीत पोते अंथरूण टाकलेले व जाड वाकळ हा सीन मला पुन्हा पुन्हा आठवितो. या साऱ्या जुन्या आठवणी आता निघून गेल्या आहेत मी लहान असताना हे सारे पाहिले आहे. आजोबा आजी वडील चुलते ही मंडळी निघून गेली…।
… त्यांच्या आठवणी मात्र माझ्या स्मरणात आहेत मी लहान असताना माझ्यावरती माझ्या आईचे संस्कार झाले. परवा परवा आई निघून गेली मी रेल्वेतून रिटायर झालो. आणि मी शेती करू लागलो परंतु याच शेतीमध्ये लहानपणाच्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या.
मी ज्या लिंबाच्या झाडाखाली खेळत होतो ते झाड आत्ता नाही परंतु दुसऱ्या बाजूला एक लिंबाचे झाड उगवले आहे. या झाडाकडे पाहिले की पाठीमागची आठवण होते. याच शेतामध्ये आमचे पूर्वीचे स पार नाही शिवाय माझी आजी आई माझे वडील चुलते नाहीत. हे सारे सध्या बदलले आता मी माझ्या वाटणीला आलेल्या तुकड्यांमध्ये काकडी केली आहे. तीच ही काकडी तुम्हाला ऐश्वर्य वाटणार याच शेतीमध्ये मी बरेच दिवस काढले परंतु घरातील माणसांची आठवण अजून मला येते.
जुने दिवस आठवले की माझ्या मनाची काहिली होते. म्हणूनच मी एक वेडा लेखक या शेती भोवती फिरतो. मी रिटायर झालो मी या शेतात काकडी केली परंतु ही काकडी खायला माझी आई माझा वडील माझी आजी नाही याचे दुःख मला फार होतो. मी रिटायर झाल्यानंतर केलेली ही काकडी. आठवणी अमर हातात पण निघून गेलेली माणसे पुन्हा पुन्हा आठवतात एवढे मात्र निश्चित..।
-दत्तात्रय पांडुरंग मानुगडे..
ग्रामीण कथा लेखक..।
Leave a Reply