नवीन लेखन...

शेतकरी; बंदुका आणि शरद जोशी





शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकऱ्यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा पुन्हा एकदा अक्षरश: बाजार मांडला आहे. त्यांचे कोणतेही आंदोलन

शेतकऱ्यांच्या हितासाठी कधीच नव्हते आणि म्हणूनच त्यांच्या कोणत्याही आंदोलनातून शेतकऱ्यांचे हित साधल्या गेले नाही. ऐन निर्णायक क्षणी पेटलेले आंदोलन मागे घेऊन त्यांनी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला. आंदोलन सुरू केल्यावर शेतकऱ्यांनी, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आपले सर्वस्व त्यात ओतायचे, घर-दार, पोरंबाळं, आपला संसार वाऱ्यावर सोडून आपल्या पंचप्राणासाठी रस्त्यावर उतरायचे आणि त्या पंचप्राणाने मात्र आंदोलन यशस्वी ठरतेय, असे लक्षात येताच अनाकलनीय पद्धतीने संशयास्पदरित्या पेटते आंदोलन अचानक मागे घ्यायचे, हा अनुभव एकदा नव्हे अनेकदा आला आहे. खरेतर असे म्हणता येईल की, शरद जोशींच्या प्रत्येक आंदोलनाची अखेर अशीच विश्वासघाती झाली आहे. रस्त्यावर उतरायचे कुणी, पोलिसांच्या लाठ्या खायच्या कुणी, केसेस आपल्या मागे लावून घ्यायच्या कुणी आणि नेता म्हणून मिरवायचे मात्र शरद जोशींनी! साधारण 1990 पर्यंत हाच प्रकार सुरू होता.संघटनेत सुरूवातीपासून सुरू असलेला किंवा मुद्दामहून सुरू ठेवलेला वैचारिक गोंधळ नव्वदपर्यंत कायम होता. राजकारणात उतरलो तर जोडे मारा, हे त्यांचे तेव्हाचे भावनिक आवाहन होते. खरेतर राजकारण करायचे नाही, ही काही त्यांची तात्विक भूमिका नव्हती. ती सोयीची राजकीय भूमिका होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांना हे फार उशिरा लक्षात आले. परिवर्तन घडवून आणायचे असेल तर राजकीय व्यवस्थेच्या माध्यम

ातूनच ते शक्य असते, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही, परंतु स्वत:चा कावेबाज चेहरा झाकण्यासाठी त्यांनी हा तत्त्वाचा, त्यागाचा मुखवटा चढविला होता. कालांतराने तो गळून पडणार होताच आणि तसा तो गळून पडलादेखील, परंतु तत्पूर्वी शरद जोशींनी ज्या कामाची सुपारी

घेतली होती ते काम तडीस नेले. राजकारणापासून अलिप्त राहण्याचे नाटक करीत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या शरद जोशींनी शेतकऱ्यांची वैचारिक दिशाभूल करण्याचे काम व्यवस्थितरित्या पार पाडले. भारत सरकार डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी करेपर्यंत या प्रस्तावाच्या संदर्भात शेतकऱ्यांचा संभाव्य विरोध दडपून टाकण्यात शरद जोशी कमालीचे यशस्वी ठरले. हा प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त आहे, हे शेतकऱ्यांच्या गळी उतरविण्यात अर्थतज्ज्ञ असल्यामुळे शरद जोशींना फारसे प्रयास पडले नाही. सरकारच्या बरोबरीने शरद जोशींनी जागतिक बाजारपेठेचे, आर्थिक स्वातंत्र्याचे भ्रामक स्वप्न शेतकऱ्यांसमोर उभे केले. डंकेल प्रस्ताव स्वीकृत होईपर्यंत शेतकऱ्यांसमोर या प्रस्तावाची काळी बाजू येणार नाही, याची दक्षता शरद जोशींनी घेतली. भारत सरकारने डंकेल प्रस्ताव स्वीकारला आणि शरद जोशींची पहिली प्रतिक्रिया आली, ती होती ‘माझे अवतारकार्य आता संपले.’ म्हणजेच माझा करार आता संपला. शेगाव अधिवेशनात शरद जोशींनी शेतकरी आता आर्थिक गुलामगिरीतून बाहेर आला आहे, शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे, शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करावा, अशी घोषणा केली. त्याच अधिवेशनात त्यांनी शेतकरी संघटनेचे आंदोलन आता आर्थिक बाबींशी निगडित नसून आता लक्ष्य राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे असल्याचे सांगितले. राजकारणात उतरलो तर जोडे मारा, ही घोषणा आता मागे पडली आणि शेतकऱ्यांच्या या पंचप्राणाने शेतकऱ्यांच्या विश्वासाची राजकीय किंमत वसूल करायला स
ुरुवात केली. डंकेल प्रस्तावाने आपल्याला कोणत्या खड्ड्यात लोटले आहे, याची कल्पना शेतकऱ्यांना आली नव्हती. डंकेल प्रस्तावाचे चटके आपल्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या या बावळट शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बसायला सुरुवात होईपर्यंत आपली राजकीय पोळी शेकल्या जाऊ शकते, हा हिशोब करुन जोशी अँड कंपनी राजकारणात उतरली. ठाामीण भागातील जनतेला नेतृत्व देऊ शकणारे तरुण अर्थातच हरकले आणि जोशींच्या भुलभुलैय्याला बळी पडून संघटनेत सामील झाले. त्यांना राजकारणाच्या आखाड्यात उतरवून पुरते गारद करण्याचे काम शरद जोशींनी केले. दरम्यानच्या काळात भाजप-सेना यांना भगवी गिधाडे म्हणत म्हणत शेवटी त्याच पक्षाचा प्रवास करीत जोशींनी राज्यसभेची खासदारकी, ‘टास्क फोर्स’चे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले होते. ज्यांच्या जीवावर जोशींनी हे सगळे राजकीय वैभव कमावले ते सामान्य कार्यकर्ते मात्र फसलेल्या आंदोलनाचे खटले अंगावर ओढून घेऊन बरबाद झाले. या कोर्ट केसेसने हजारो कार्यकर्त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त झालीत. शरद जोशींचे काय नुकसान झाले? ‘कुणब्याच्या पोरा लढायला शीक’ असे भावनिक आव्हान करीत शरद जोशींनी या पोरांच्या आयुष्याचे मातेरे केले. आता पुन्हा एकदा शरद जोशींचे नवे नाटक सुरु झाले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता बंदुका हातात घ्याव्यात, असे आवाहन करीत ते फिरत आहेत. हातात घेतलेल्या बंदुका कोणावर रोखायच्या, या प्रश्नाचे शरद जोशींजवळ काय उत्तर आहे? त्यांचा इशारा सरकार आणि प्रशासनाकडे असेल तर ते स्वत:च सरकारचा एक भाग आहेत, हे त्यांनी विसरु नये. राजकीय व्यवस्था शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही आणि इतर कोणत्याही संसदीय मार्गांनी हा न्याय मिळू शकत नाही, अशी शरद जोशींची खात्री पटली असेल तर त्यांनी स्वत: आधी हातात बंदूक घ्यावी. ते खासदार आहेत. बंदूक हातात घेऊन त्यंानीच सरकारला जाब व
चारला तर कदाचित शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत लवकर पोहचतील. आतापर्यंत कुणब्याच्या पोराला लढायला लावून त्यांनी दुरुन तमाशा पाहण्याचे काम केले. किमान आतातरी त्यांनी आधी रस्त्यावर उतरावे. पोलिसांच्या लाठीचा मार कसा असतो, कोर्टाच्या केसेसमध्ये माणूस कसा बेदम होतो आणि या सगळ्या त्रासाची फलनिष्पत्ती जेव्हा शून्य येते, तेव्हा अगदी कणखर माणूसही कसा कोलमडून पडतो, हे शरद जोशींनी एकवेळ स्वत: अनुभवावे. हाती बंदूक घेण्याचा सल्ला देणे फार सोपे असते. मात्र, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी जो त्याग करावा लागतो त्याची किमत संपूर्ण घरादाराला

चुकवावी लागते. निष्पाप बायका-पोरांची आयुष्य बरबाद होतात. वास्तवाचे हे चटके शरद जोशींनी

कधी सोसलेच नाही आणि सोसण्याची त्यांची तयारीही नाही. शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या समस्या हे त्यांच्या ध्येयसिद्धीचे लक्ष्य कधीच नव्हते. त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता स्वार्थाची चौकट कधीच ओलांडू शकली नाही. स्वत:चा स्वार्थ साधण्याकरिता प्रचंड वैचारिक गोंधळ या माणसाने शेतकऱ्यांमध्ये पसरवला. त्यात शरद जोशींचे काहीच नुकसान झाले नाही. त्यांची स्वत:वह आर्थिक आणि राजकीय प्रगती नेहमी चढत्या श्रेणीत राहिली. खरी किंमत चुकविली ती त्यांच्या भ्रामक विचारांना बळी पडलेल्या सामान्य कार्यकर्त्यांनी. राजकारणात उतरलो तर जोडे मारापासून काल मोर्शीत उच्चारलेल्या शेतकऱ्यांनी आता बंदुका हाती घ्याव्यात, इथपर्यंत शरद जोशींच्या मागे जाणाऱ्यांचा प्रवास केवळ शून्यापासून शून्यापर्यंत जाणारा ठरला. या प्रवासाने शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा आणि निराशाच टाकली. शरद जोशींचे प्रत्येक आंदोलन हे केवळ एक नाटक होते. नाटकांच्या या नायकाने आता नवे नाटक सुरु केले आहे. हे नाटकदेखील विस्मृतीत जाईल आणि पुन्हा नव्या नाटकाची घोषणा होईल. त
त्यांचा स्वभावच आहे. तीच त्यांची वैचारिक प्रवृत्ती आहे. फक्त त्यांच्या पाठीशी असलेल्या उरलेल्या मोजक्याच गरीब आणि आशाळभूत शेतकऱ्यांना या नाटकातील फोलपणा किती लवकर लक्षात येतो, हाच एक प्रश्न आहे.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..