माझा शेतकरी आत्महत्या का करत आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय?
राब राब शेतात राबतात. त्यांची भाकर कष्टावर असतात. एक दिवस शेतात न गेलेला दिवस कधी माझ्या राज्याने बघितला नाही. कधी सुखाने निवांत बसला नाही. आणि हे राजकीय नेते त्यांना फक्त निवडून येण्यासाठीच फक्त त्यांच्यावर प्रेम असल्याचे दाखवत आहे.
माझा राजा चार घरांची भाकर बनवतो. चार घराणं पोसतो. स्वतः कर्जबाजारी होऊन चार मजुरांना काम देतो. आणि सरकार त्यांना मदती साठी काय देते?
एक प्रकारची भिकच मनावि. म्हणून माझा राजा सरकार पेक्षा खूप छान आहे. त्यांचे कार्य महान आहे. म्हणून त्या शेतकरी राज्यांना शत शत नमन
— नरेन्द्र नाकले
लेखकाचे नाव :
नरेन्द्र नाकले
लेखकाचा ई-मेल :
narendranakle3@gmail.com
Leave a Reply