देह चिखलाचा गोळा,
माय बाप रे कुंभार
त्यासी देती ते आकार,
तसा तसा घडे जाय..!!!
लहानपणी माय बाप,
बहीन भाऊ गोतावळा,
मोठा व्हता बायको भार्या,
जिनं व्यापुनं टाकीते…!!!
लेकर बाळ आन संसारं,
दमछाकीचा तो खेळं,
किती धावशीलं पळशीलं,
भावना बाजाराचा मेळं…!!!
देवा बाजार मांडला,
सगळे बाव्हले बाव्हले,
मोह टाकुनिया त्यातं,
जिवं कामालं लावले…!!!
देवा देले दोनं हातं,
किती मावलं रे त्यातं,
येता येळ निरोपाची,
वंजुळ कायमचं रिती…!!!
येता शेवटची वेळं,
नच थांबीतो तो काळं,
आखरीची ओठी ओळं,
तीबी देहासंगं जळं !!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply