नवीन लेखन...

शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका

गिरनार हा सौराष्ट्र मधला जंगल पर्वतमय भाग. येथील अभयारण्यात  सहल  म्हणून अनेक यात्री बरोबर जाण्याचा योग आला होता.  सर्व परिसर शासनाचा संरक्षित ( Protected  area )  टापू म्हणून समजला गेला. प्रचंड जंगले आणि त्यात  सर्व प्रकारची जंगली जनावरे  यांचे स्वैर वास्तव्य  असलेला भाग. जंगलामधून जाण्यासाठी  कच्चा रस्ता केलेला होता. दुतर्फा घनदाट झाडी, सूर्य- प्रकश वा  उन्हे यांना रोकणारी दिसून आली. वळणा वळणाचे रस्ते. रस्त्यावर ठीकठीकानी सूचना फलक दिसून येत  होते.  फलकावर निरनिराळ्या  प्राण्यानची चित्रे व वैज्ञानिक माहिती संक्षेपात होती. त्याच  प्रमाणे त्या प्राण्यांचे योग्य संरक्षण व संवर्धन करण्याविषयी आदेशवजा सूचना दिलेल्या होत्या. जंगली जनावरे आणि वृक्षलता  ही निसर्गाची देन  असून आपला मित्र परिवार आहे. ही भावना जागृत  ठेवली जायची. कांही  ठिकाणी पाण्याचा  साठा असलेली तळी वा कृत्रिम हौदपण दिसून आले.

आमची यात्रा-बस हालके हालके सर्व परिसराची पाहणी करीत जात होती.  रस्त्यात अनेक प्राणी आम्हास दिसून आले. हात्ती, गेंडे, पान घोडे, वानरे, झेब्रे, हरीन, काळवीट, कोल्हे, ससे आणि वाघ सिंह, अस्वले, इत्यादी. कांही प्राणी एकटे भटकताना  दिसले तर कांही कळपामध्ये एकत्रित असल्याचे दिसून आले. हे सारे नैसर्गिक रम्य मनोहर व रोमांचकारी  देखावे बघताना खूप आनंद वाटत होता.

एका ठिकाणी आम्ही जे दृश बघितले. त्यांनी सर्वजण अचंबित झालो. विचार करण्यास  लावणारी ती घटना होती. निसर्गाचा व त्याचा  योजनेचा एक  चमत्कार वाटला. एका मोठ्या  दगडाच्या शिळे जवळ एक मोठा बिबळ्या वाघ बसलेला दिसला. शांत असून फार हालचाली नव्हत्या. जवळच लहान  पाणवठा व खूप गवत वाढलेले होते. आमची  उत्सुकता  आणि आश्यर्य  शिगेला पोहोंचले होते. कारण त्या वाघाच्या  अगदीच जवळ अंतरावर कांही  हरीण शांत मनाने तेथेच गवत चरत होती.

आमच्या सहल आयोजकांनी आमची बस जवळच उभी करून तो अप्रतिम नैसर्गिक देखावा बघण्यास वा त्याची छबी काढण्याच्या सूचना दिली होती. बराच वेळ पर्यंत ते दृश्य आम्ही बघत होतो. वाघाचे शांत बसणे, व त्याच्याच समोर हरीणांचे गवत चरणे, विश्वास बसणार नाही, अशी ही  घटना होती. जवळ जवळ अर्धा तास पर्यंत आम्ही ते बघत होतो.  नंतर मात्र सर्व हरीण चरत चरत दूर निघून गेली. वाघ मात्र तेथेच  बसला होता.  काळजी पूर्वक आमच्या संयोजकाने दूर अंतरावरून त्या वाघाच्या दिशेने कांही दगड भिरकावले. त्याला एक दोन लागताच त्याच्या हालचाली दिसल्या. तो तिथून  उठून जाण्याचा  प्रयत्न करू लागला. तो वाघ घायाळ झालेला होता. त्याचा मागच्या एका  पायाला  दुखापत झालेली होती. तो आपली जागा  बदलण्याचा  प्रयत्न करू लागला. तो फरफटत दुसरीकडे जाऊ लागला. त्याची असहायता , दुखापत, आणि स्वरक्षणाचा प्रयत्न हे बघताना देखील एक वेगळीच  रोमांचकारी भावना येत होती.

एक भयावह क्रूर जंगली प्राणी परंतु आम्हा सर्वामध्ये भूतदया  निर्माण करून गेला. निसर्गाच्या अप्रतिम कल्पकतेचे ह्या प्रसंगी दर्शन झाले. शिकारी आणि शिकार ( भक्ष ) ह्यामध्ये  एक विलक्षण रोमांचकारी नाते असते. प्रत्येक सजीव प्राणी ह्या दोन्ही ही  भूमिकेमधून सतत  जात असतो. जो शिकार करतो तो भक्ष ही बनतो. व जो भक्ष बनतो तो देखील जगण्यासाठी शिकारी बनत असतो. त्याचमुळे शिकारी व शिकार ह्यांचे गुणधर्म  त्या एकाच प्राण्यात आढळून येतात. चपलता,  चंचलता, आक्रमकता, बचावात्मकता, वेध, लक्ष, अचूकता, प्रयत्न, धडपड, आणि हे सारे  करताना स्वता:चे रक्षण  ह्या सर्व गुणांचे  मिश्रण प्रत्येक प्राण्यात निसर्गाने जन्मता: दिलेले असते.   आपले भक्ष करणारा, आपल्या दृष्टी  टापूत  बसलेला आहे. मात्र तो विकलांग झालेला, हतबल  झालेला ह्याची जाणीव  हरिणाला होणे हे फार महत्वाचे वरदान आहे. त्याचमुळे ते त्याक्षणी  बेफिकीर  वृत्तीचे होऊ शकले.  आणि इकडे वाघ, त्याला विवंचना होती ती त्याचा दुखापतीची. स्वतःच्या देहाची वा शरीराची.

शेवटी कोणीही आणि कितीही शक्तिवान  असला तरी त्याला निश्चित  जाणीव  असते स्वतःच्या सामर्थ्याची.

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..