नवीन लेखन...

शिक्षणाचे मानसशास्त्र: SMART Objectives = सामोसा विका!

माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? वेळ चांगला जावा म्हणून नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले (कोरोना काळात …!). त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले.

  • The purpose of the education system is to develop good human beings capable of rational thought and action, possessing compassion and empathy, courage and resilience, scientific temper and creative imagination, with sound ethical moorings and values. (Page 4)

“प्रश्नोपद्व्याप” चांगला टाईम पास असल्यामुळे प्रश्न विचारून सुरू केला – “good human beings” म्हणजे काय? पुढचे शब्द उत्तर सांगताहेत अस वाटलं पण पटलं नाही. शब्द योजनेतून हे मनुष्याचे “हे गुण” विकसित करायचे का असे गुण असलेले “मनुष्य” विकसित करायचा आहे हे कळले नाही. आणि विकसित झाले की नाही याची काही मोजमाप? कळणार कसे आणि केव्हा? प्रश्नांची काय कमी… विचार भरकटले तसे वैचारिक घोड्याला आवर घालून पुन्हा वाचनाकडे वळलो. आणि पुढच्या वाक्याला अजूनच अडखळलो!

  • It aims at producing engaged, productive, and contributing citizens for building an equitable, inclusive, and plural society as envisaged by our Constitution.

यातला “producing – (मनुष्य) निर्मितीची” संकल्पना खटकली. पण इंग्रजीत जीभ जड असू शकते – promoting engaged, productive, and contributing membership of society … अस काहीतरी जास्त संयुक्तिक म्हणायचे असेल कदाचित.

विचारांचे घोडे स्वैर उधळले – सार्वजनिक शिक्षण हे विशिष्ट गुणधर्म असलेले नागरिक निर्माण करण्याची प्रक्रिया (क्लोानींग) आहे का ज्ञान, कला, कसब, कौशल्य संस्कार प्राप्तीची (लर्निंग)? शिक्षणाने विशिष्ठ घाटणीची, राज्यकर्त्याला सोयीची माणसं घडवावीत का प्रत्येकाला आत्मनिर्भर होऊन उत्कर्ष साधण्यासाठी समृद्ध करावे (एनलाईटन)? शैक्षणिक उद्दिष्ट काय असावे?

पण लगाम खेचून घोड्याची दिशा बदलली. स्वैर खोचकपणा पेक्षा आपले विचार मांडावेत आणि सुसंवाद साधावा. सर्वांचे विचार ऐकून आपण वैचारिक श्रीमंत होतोच ना? (तुका म्हणे दॅट इन दॅट.) माझा शब्दोछल करण्याचा किंवा (वात्र)टीका (धोरणावर) करण्याचे हेतू नाही. उद्दिष्ट शब्दांकनाचे महत्व आणि महतीकडे लक्ष वेधण्याचा आहे. उद्दिष्ट कथनातच गडबड झाली तर “ध” चा “मा” होऊन पेशवाई बुडाल्याचे पुनःप्रत्यय येतील. म्हणून शैक्षणिक उद्दिष्टांच्या व्याकरणाकडे आणि शैक्षणिक उद्दिष्ट कशी असावीत/लिहावीत? या दिशेने जाण्याचा विचार आहे. (तर आता तिकडे वळा वळसंगकर शास्त्री! ?)

ध्येय, हेतू, उद्देश ई. आणि उद्दिष्ट

सर्व सामान्य तर्क असे सांगतो की बहुतेक ध्येय / हेतू व्याप्तीमर्यादा टाळण्यासाठी ढोबळ मांडले जातात. पण उद्दिष्ट (ध्येय नव्हे) व्यावहारिक, तर्क-संगत आणि विशिष्ठ असतात. त्यामुळे सर्व श्रेष्ठी, गुरुजन, विशेषतः व्यवस्थापन तज्ञ पंडित, शास्त्री (काही मझ्यासारखे स्वयंघोषित सुद्धा) सांगतात की मोठ्या आणि व्यापक उद्दिष्टाना लहान पण साध्य, तर्क संगत आणि व्यावहरिक उप-उद्दिष्टांमधे परिवर्तित करावीत. मग पायरी पायरीनेे यशाची शिडी चढता येते. त्यासाठी उद्दिष्ट स्मार्ट असली पाहिजेत. गूगल सर्च करा – बहुतेक हाच मजकूर मिळेल:

  • “Objectives must be SMART – Specific, Measurable, Achievable, Realistic & relevant and Time-bound.”

म्हणून उपरोक्त उद्दी्ष्ट उप-उद्दिष्टांमधे परिवर्तित कशी करावी हा मला पडलेला प्रश्न (प्रश्नोपद्व्याप!). शैक्षणिक दृष्ट्या पुढे त्यांना अध्ययनाच्या व्यापक विषयांमधे (subjects) आणि अजून पुढे विषयतून विशिष्ठ धड्यात (lessons and topics) परिवर्तित कसे करावे? असे कोणते विषय आणि धडे हे उद्दिष्ट साध्य, आणि पर्यायाने गुण प्राप्त करून देतात (पाठ्यक्रम किंवा करिक्युलम डिझाईन हा एक वेगळाच विषय आहे नाही का? असो! नंतर कधीतरी. आज फक्त उद्दिष्टांचे व्याकरण!)

SMART Objectives = “सा.मो.सा. वि.का.”

SMART Objectives काय असतात, ती कशी ठरवावीत, लिहावीत ई. गोष्टीवर इंग्रजीत लाखोंच्या संख्येने वेबपेजेस सापडतात. मात्र उद्दिष्ट कशी व काय असावी हे मराठीमधे इंटरनेटवर फारसे काही वाचायला मिळाले नाही. पुस्तकं शोधावी तर, पुस्तकांचे दुकानंही दुर्मिळ होताहेत. Amazon वर आहेत, पण ते पुस्तक फारसे “चाळू” (ब्राउजिंग) देत नाहीत आणि त्यावर भाष्य करणारा जाणकार दुकानदार किंवा एखादा उत्साही ‘कसटुंंबर’ जवळपास नसतो! (Review वर माझा विश्वास पूर्वीच उडाला आहे.) त्यामुळे हे माझे लिखाण रुपी अर्ध्य, इंटरनेटम् गंगारपणम् अस्तू। ☺

SMART हा acronym उद्दिष्टांचे गुणधर्म सांगते. (अँक्रोनिम् – अडद्याक्षरावरून केलेला सांकेतिक शब्द.)

  • S अक्षर सांगते की उद्दिष्ट स्पेसिफिक किंवा विशिष्ट, नेमके, असंदिग्ध असाव. एकच अर्थ निघावा, ढोबळपणा नसावा. उदा. “सर्वांचे कल्याण …” कल्याण म्हणजे नेमकं काय? भौतिक का आधिभौतिक?
  • M अक्षर सांगते की उद्दिष्ट मेझरेबल किंवा मोजता यावे मोघम नको. “चांगले समजेल”, “समाधान मिळेल” समाधान, समज कसे मोजावे? थोडे थोडे समजलं या वाक्याला फारसा अर्थ नाही. भाषा थोडी थोडी समजते म्हणजे काही मोजके नित्योपयोगी शब्द, वाक्य ज्ञात आहेत आणि ते वापरून वेळ मारून नेता येती. पण नेमके किती? (कानडी लोकांच्या मराठीवर काय कमी विनोद आहेत? पु.लंच्या रविवार सकाळ नाटकातल्या कडेकडे मामी आठवतात?)
  • A अक्षर अचीवेबल किंवा साध्य असावे असे सांगते. हत्ती सहज उचलता येईल सारखे दिवा स्वप्न नकोत.
  • R काहीसे तिसऱ्या सारखेच आहे. रिअलिस्टिक आणि रेलवंट गुण वास्तवाला धरून चालण्यास सांगतात. शेख चिल्ली उद्दिष्ट नकोत. फ्यूज बदलता येतो म्हणजे कोणाला विद्युत अभियांत्रिक पदवी देत येईल?
  • T शेवटी वेळेचं बंधन घालतोेे. “हे कार्य करू कधीतरी” असे कार्य क्वचितच केले जाते. फार दूरचे उद्दिष्टही कधी कधी कालबाह्य होतात, किंवा त्यातले स्वारस्य, महत्व विरून जाते. निरंतर शिक्षण म्हणजे एकेक वर्षात दहा दहा वर्षे काढण, किंवा तेच तेच उगाळणेे असे नाही.

मराठीत SMART सदृश acronym = “सा.मो.सा. वि.का”

अर्थात:

  • साध्य,
  • मोजता येतील असे (गुणांकनिय),
  • सार्थ (संयुक्तिक, वास्तवाभिमुख),
  • विशिष्ठ (स्पष्ट, असंदिग्ध, एकारथी), आणि
  • कालबद्ध.

(क्रिएटीव्ह वाचकहो – अजून / वेगळे काही सुचवा पतीसादमध्ये?)

ह्या विषयाचा शिक्षणात उपयोग काय? इथे ब्लूम्स साहेबांची एन्ट्री घेताते. (Blooms taxonomy of learning मधले आपले ब्लूम्स साहेब हो). ब्लूम्स संहिता बघूच, पण आधी उद्दिष्ट मांडण्याचे व्याकरण पाहू.

शैक्षणिक, अध्ययन उद्दिष्ट – व्याकरण

स्मार्ट गुणधर्मा बरोबर उद्दिष्ट मांडण्याचे व्याकरणाचे नियम पण महत्वाचे.

इंग्रजीत साधारणतः वाक्य रचना कर्ता-क्रियापद-कर्म असावी असा संकेत आहे (Active voice, subject verb object structure). हाच प्रयोग मराठीत स्पष्ट उमटत नाही. उदा: You will be able to replace the shorted fuse wire” अर्थात “तुम्हाला बदलता येईल जळलेली फ्यूज वायर” पेक्षा “तुम्हा जळलेली फ्यूज वायर बदलू शकाल” बरे वाटते. इथे कर्ता-कर्म-क्रियापद रचना योग्य वाटते. (कर्तरी प्रयोग )

उदा:

हा 3 महिन्याचा अभ्यासक्रम 80% गुण मिळवून पूर्ण केलात, तर तुम्ही:

  • न्यूटनचे 3 नियम प्रत्येकी 2 उदाहरणे देऊन समजावून सांगू शकाल, (state and explain)
  • अंतर, वेग, प्रवेग, वेळ यांचे नाते 5 विविध सूत्र रुपात परिवर्तित करून दाखवू शकाल, (convert to 5 kinematic equations)
  • अंतर, वेग, प्रवेग, वेळ नात्यांची सूत्र वापरून गणित कशी सोडवावी हे स:उदाहरण दाखवू शकाल. (demonstrate and apply)

थोडक्यात:

(हा कोर्स, वेळ) (अट/परीक्षा पास करून) पूर्ण केल्यावर, तुम्ही (कोर्स करणारे):

  1. (प्राप्तीसाठी विषय, अट, पातळी) (क्रियापद) (क्षमता) …
  2. (प्राप्तीसाठी विषय, अट, पातळी) (क्रियापद) (क्षमता) …
  3. … … …

इथे “सामोसा विका” पद्धत आणि व्याकरण दोन्ही वापरले आहेत. पहिल्या वाक्यात वेळ आणि अट सांगितली आहे. कर्ता (object) आधी, कर्म वाक्यांश (subject phrase) दुसरे आणि क्रियापद वाक्यांश (verb phrase) शेवटी आले आहे.

एकंदरीत:

  • उद्दिष्ट विशिष्ट आणि स्पष्ट होते, यशपयशाची मोजणी सुद्धा स्पष्ट होते. परीक्षा कशी घ्यावी आणि कसे प्रश्न विचारावेत हे स्पष्ट होते. काय साधणार आहे हे कळते.
  • परीक्षा शैक्षणिक प्रयास किती प्रभावी होता, सुधारणा हवी असल्यास कुठे करावी, किती करावी अशा अनेक बाबी स्पष्ट करतात. परीक्षा ही विद्यार्थ्यांना “अ” ते “ढ” वर्ग करण्यासाठी नसून काय साधले, अजून काय करावे लागेल आणि पुढे जाण्याचा लाल हिरवा कंदीलाचे काम करते.

 

थोडेसे मागे जाऊ … पूर्वीच्या माझ्याच एक लेखातून, (माझ्या पूर्व परवानगीने?)…

ब्लूम्स टॅक्सओनॉमी ऑफ लर्निंग

ब्लूम्स साहेबांनी शैक्षणिक अथवा अध्ययन / अध्यापन उद्दिष्ट ठरवताना यशापयश कसे मोजणार हे निःसंदिग्ध पणे सांगता आले पाहिजे हा मुख्य निकष मांडला. हेतू, ध्येय साधले का नाही हे पुढे काळ ठरवेलच, पण पुण्याहून दिल्लीला जाताना वाटेत आरंगाबाद जळगाव ठेशणं लागली नाही, कोल्हापूर, बेळगाव ठेशणं आली तर चौकशी करुन मार्ग सुधारायला नको?

अमेरिकेत, शाळा कॉलेजच्या अभ्यासक्रम आणि परीक्षा यात समनव्य हवे आणि परीक्षा जास्त समर्पक आणि कारणोचित (fit for pupose) व्हाव्यात म्हणून बेंजामिन ब्लूम यांच्या अध्यक्षते खाली एक समिती अस्तित्वात आली. समिती ने मूळ शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण करण्याची संहिता निर्माण केली आणि त्या साठी एक क्रियापदांची संहिता निर्माण केली. हीच ती ब्लूम्स टॅक्सओनोमी! (टॅक्सओनॉमी = संहिता/फ्रेम वर्क). संहितेतले क्रियापद परीक्षा प्रश्न आणि गुणांकन स्पष्ट करतात, आणि एकंदरीत अभ्यासक्रमाचे आणि शिक्षण पध्दतीचे मूल्यांकन अचूक आणि उचित होते.

ब्लूमस समिती ने 6 शैक्षणिक स्तर घडवले:

  • Level 1. ज्ञात आहे (knowledge)
  • Level 2. आकलन आहे (comprehension)
  • Level 3. उपयोग करू शकतो (application)
  • Level 4. विवेचन करू शकतो (analysis)
  • Level 5. संश्लेषण करू शकतो (synthesis – नवीन जडण घडण करणे)
  • Level 6. मूल्यांकन करू शकतो (evaluation)

पुढे समितीने प्रत्येक स्तरासाठी क्रियापदांची सुची तयार केली आणि शिकण्याचे उद्दिष्ट सांगताना त्यांचा वापर सुचवला. (इंटरनेटवर सहज (पण इंग्रजीत) उपलब्ध.)

हा विषय महत्वाचा का आहे?

माझे विचार असे:

  • शिक्षणाचे उद्दिष्ट हा फार व्यापक आणि मोठा विषय आहे. या उद्दिष्टांमधे अनेकांचे (स्टेकहोल्डर्सचे) उद्दिष्ट एकत्र येतात. शिक्षणातून राज्यकर्त्ये कायदा पाळणारे आत्मनिर्भर नागरिक घडवण्याची इच्छा करतात, समाज सभ्यता आणि समृद्धता हुडकतो. शिक्षण संस्था ग्राहक (विद्यार्थी) मागणी–संतुष्टता पाहतात, पालक मुलांच्या भवितव्याची अपेक्षा करतात तर विद्यार्थी वेगळी अपेक्षा करू शकतात.
  • उद्दिष्टांचे शब्दांकन महत्वाचे आहे. कारण आपणां वारंवार त्यांचे पुनरावलोकन करत असतो. त्यातले के साधले नाही साधले बघतो. शैक्षणिक उद्दिष्ट तर फारच चोखंदळ आणि किचकट. एकीकडे शैक्षणिक संस्थांना स्थळ, काळ, वेळ आणि लागणारा सरंजाम सांगतात, प्रवेश पात्रतेचे नियम ठरवतात. तर दुसरी कडे शिक्षकांना नेमके काय शिकवावे आणि किती तपशील असावा हे सांगतात. अजून तिसरीकडे विद्यार्थी नेमकं काय शिकले हे त्यांना नौकरी काम धंदा देणाऱ्यांना स्पष्टपणे सांगतात, तर अजून पुढे या सगळ्या खटाटोपीचा जो मुख्य लक्ष्य आहे, त्या विद्यार्थ्यांना (+ त्यांच्या पालकांना) ते काय नेमकं शिकणार आणि करू शकणार हे सांगण्यासाठी शास्त्रशुद्ध उद्दीस्ट उपयुक्त ठरतात.
  • इंटरनेटवर इंग्रजीतल्या अश्या ललित लेखनाचा खच पडला आहे. जन सामान्यांना विना खर्च विना सायास असे लेख मिळतात ज्याचा त्यांना विविध ठिकाणी उपयोग होतो. मराठीत SMART objectives सारखे काही मला दिसले नाही, म्हणून लिहिले, आणि महत्व पटवून देण्यासाठी वानगीचा विषय इतका महत्वाचा निवडला.

वाचन आणि अभिप्रायासाठी धन्यवाद.

— राजा वळसंगकर

४.१२.२०२०

 

Avatar
About राजा वळसंगकर 18 Articles
नमस्कार. मी व्यवसायाने इन्स्ट्रक्शनल डिझाइनर आहे. शैक्षणिक मजकूर / साहित्य उत्तम शिकता कसे येईल ह्याचा शास्रोक्त विचार करून ई-लर्निंग प्रणाली तयार करावी लागते. सादर करण्यासाठी नाटक / चित्रपटाच्या स्क्रिप्ट (स्टोरी बोर्ड) प्रमाणे मजकूर पुनः बांधणी करून लिहावा लागतो. नंतर या स्क्रिप्ट प्रमाणे प्रणालीकरते (प्रोग्रामर्स) संगणकावर किंवा मोबाइलवर चालणारी प्रणाली तयार करतात. सादरीकरणासाठी मजकूर अँड स्क्रिप्ट तयार करणे हे माझे मुख्य काम. ह्यातला मुख्य अभ्यासाची तोंड ओळख मराठीतुन करून देण्याचा माझा लेखन प्रपंच. अभिप्राय - प्रतिक्रिया - crabhi@hotmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..