नवीन लेखन...

शिंडलर्स लिस्ट (१९९३)

शेवटचा प्रसंग
Itzhak Stern:
“Whoever saves one life, saves the world entire..
There will be generations because of you…”
Oskar Schindler :
“I didn’t do enough…”
Itzhak Stern :
“You did so much…
You saved 1200 lives…”
शिंडलर्स लिस्टचा हा शेवटचा संवाद अशक्य म्हणजे अशक्य भारी आहे..
नाझी पार्टीचा सभासद आणि चंगळवादी आॕस्कर शिंडलर..
युद्धात आपली चांदी करायची म्हणून एक भांड्यांची फॕक्टरी चालवतो..
कमी पगार द्यावा लागतो म्हणून बहुतांश ज्यूंना कामावर ठेवतो..
नंतर उपरती होउन आपल्या जास्तीत जास्त कामगारांना नाझींच्या कँपमधल्या मरणापासून वाचवू पहातो..
युद्ध संपेपर्यंत या १२०० ज्यू कामगारांना सांभाळून ठेवतो..
त्यांना अॕश्वीज च्या कँपमधून, मरणाच्या दारातून परत आणतो..
आपली सारी संपत्ती नाझी अधिका-यांना लाच देण्यात संपवतो..
स्वतः कफल्लक होउन शेवटच्या या सीनमधे ती फॕक्टरी सोडून आपल्या पत्नी एमिली सोबत निघून जातो..
आणि मागे उरतात… १२०० कृतज्ञ ज्यू लोक..
आजही जे ज्यू लोक शिंडलरने वाचवले होते त्यांच्या पुढच्या पिढ्या जगभर सुखाने नांदताहेत..
जग त्यांना ‘शिंडलर ज्यूज’ नावाने ओळखते..
वर सांगितलेल्या या शेवटच्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर सुरु होते ती चित्रपटाची मेन थीम..
हृदय पिळवटून टाकणारे संगीत काय असते हे ऐकायचे असेल तर शिंडलर्स लिस्टची ही थीम ऐकावी..
असे वाटतं की ते तुमचं हृदय जागेवरुन उफाळून, तुमच्या गळ्यातून बाहेर येईल..
डोळ्यांचे धरण कोणत्याही क्षणी फुटून अश्रूंचा महापूर तुमच्या गालावर येईल..
स्टीव्हन स्पीलबर्ग हा स्वतः जन्माने ज्यू आहे..
त्याने निर्मीती दिग्दर्शनाची जबाबदारी अर्थात स्वतःवर घेतली..
शिंडलर्स आर्क या कादंबरीवर बेतलेला ही कथा..
ज्यावर स्टीव्ह झिलीयन ने लिहीलेली जबरदस्त पटकथा..
जानूज कमिन्सकी चे अंगावर येणारे कृष्ण धवल चित्रीकरण..
आणि पहिल्या चित्रपटापासून आजपावेतो स्पिलबर्गच्या सर्व सिनेमांना संगीत देणारा संगीतकार..जॉन विलीयम्स..
चित्रपटाची ही थीम इतकी इम्पॕक्टफुल, इतकी प्रभावी आहे की तुम्ही आधी भारावता नी मग हरवता..
पूर्ण चित्रपटात पाहिलेले असंख्य प्रसंग डोळ्यासमोर नग्न होउन फेर धरतात..
माणूसकीला काळीमा लावणारे भीषण अत्याचाराचे ते पर्व आपल्या नजरेसमोरुन सरकते..
एका ढकल गाडीत अनेक मृत ज्यूंचे प्रेत टाकून नेणारी काही माणसे दिसतात..
‘ती’ लाल कोट घालून रस्त्याने फिरणारी तीन वर्षाची मुलगी..
त्या ढकल गाडीत आपल्याला तिचेही प्रेत दिसते…
व्हाॕयोलीन ची ती निर्दयी सुरावट तुमच्या काळजात घुसते..
आणि तुमचा बांध शेवटी फुटतोच..
जॉन विलीयम्स हा हाॕलीवूड संगीताचा बेताज बादशाह आहे..
साधारण साडेचार दशकांच्या कारकिर्दीत ५२ आॕस्कर नाॕमीनेशन्स आणी पाच वेळा आॕस्कर जिंकणारा हा अवलिया माणूस..
आपला सुरवातीचे सिनेमे शुगरलँड एक्स्प्रेस आणि जॉज (Jaws) पासून स्पिलबर्ग ने फक्त आणि फक्त जॉन विलीयम्स बरोबरच काम केलय.
त्यांना जेंव्हा स्पिलबर्गने या चित्रपटाची पटकथा ऐकवली तेंव्हाचा प्रसंग त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता..तो असा..
“When he showed me Schindler’s List,” says Williams, “I was so moved I could barely speak. I remember saying to him, ‘Steven, you need a better composer than I am to do this film. ‘
And he said, ‘I know, but they’re all dead. ‘ ”
That’s a joke…
म्हणजे पहा..जॉन विलीयम्स सारख्या दिग्गज संगीतकाराला देखील आपण या विषयाला न्याय देउ शकू का अशी शंका यावी असाच तो प्रोजेक्ट होता. पण जॉन विलीयम्स यांनी आपलं सर्व ज्ञान, आपलं सर्व सांगितीक कौशल्य पणाला लावून या चित्रपटाचे संगीत अजरामर केलं. यातली लिड व्हायोलीन वाजवणारा इत्झाक पर्लमन हा देखील ज्यूइश आहे. त्याने वाजवताना त्या थिममधे जी करुणा ओतली आहे ती निव्वळ अवर्णनीय आहे
आजही जगभरातील जवळजवळ प्रत्येक सिंफनी वा फिलहार्मोनीक आॕर्केस्ट्रा मधे शिंडलर्स लिस्टची ही थिम वाजवणे हे बहुमानाचे समजले जाते. Its a priviledge to play the theme of Shindler’s list.
जोपर्यंत या जगात माणूस माणसासारखे वागेल तोपर्यंत
शिंडलर्स लिस्ट सारखा चित्रपट त्याला आठवण करुन देत राहील की माणसाचा हैवान झाल्यास माणूसकीला काळीमा लागणा-या गोष्टी घडू शकतात..(साठ लाख ज्यू लोक या ‘नाझी होलोकाॕस्ट’ मधे मारले गेले होते.) पण दुस-या बाजूला एखादा आधीचा स्वार्थी आप्पलपोटा उद्योगपती असणारा आॕस्कर शिंडलर सारखा माणूस स्वतःचे सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यू लोकांना मरणाच्या दारातूनही वाचवतो. अशा चित्रपटाची थिम व संगीत त्या चित्रपटाच्या विषयाला पूरक व प्रभावीपणाने पोहोचवणारे हवे होते.
जॉन विल्यमस्नी हे शिवधनुष्य लिलया पेललंय यात शंका नाही…

टीप:

खाली या थीमच्या तीन लिंक देत आहे

१. स्वतः जॉन विल्यम्स कंडक्ट करताना इत्झाक पर्लमनने लीड व्हायोलीनीस्ट म्हणून वाजवलेली ही थीम नक्की पहा.

२. स्पिलबर्ग आणि जॉन विलीयम्स यांच्या समोर शिंडलर्स लिस्टचे पंचवीस वर्षे झाली तेंव्हा ही थीम सादर केली गेली तेंव्हा दोघांचे पाणावालेले डोळे नक्की पहा.

३. थीम वाजवताना एका वादक महिलेला भारावून रडू कोसळले त्याचा हा अप्रतिम व्हिडिओ जरुर पहा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..